
Anti-Corruption Bureau Action : नगर : ग्रामपंचायतीच्या जन्म-मृत्यू नोंदवहीतील (Birth and Death Register) माहिती देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau Action) पथकाने जामखेड येथे रंगेहात पकडले. (Caught red-handed) महादेव मल्हारी ढाकणे (वय ५३), ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत जातेगाव, ता. जामखेड, असे ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
जेवढे पैसे देता येतील तेवढे द्या; असे सांगत लाचेची मागणी
याबाबत ५१ वर्षीय शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत अधिकारी ढाकणे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. सन १९८८ मधील ग्रामपंचायत जातेगावच्या जन्म-मृत्यू नोंदवहीत ग्रामपंचायत बोरखेडे, ता. जि. बीड येथील सरपंचाच्या नावाची नोंद आहे किंवा नाही, तसेच त्यासंदर्भातील इतर माहिती मिळावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
ही माहिती देण्यासाठी ‘तुम्हाला जेवढे पैसे देता येतील तेवढे द्या’, असे सांगत ढाकणे यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगरकडे तक्रार केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
१० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न(Anti-Corruption Bureau Action)
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ११ ऑगस्ट रोजी जामखेड येथील हॉटेल महाभागवती येथे कारवाई करण्यात आली. पंचांसमक्ष ढाकणे यांनी संबंधित माहिती देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. दरम्यान, तक्रारदाराने माहितीचा अर्ज देऊन त्यावर पोहोचही घेतली.
यानंतर याच ठिकाणी सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान ढाकणे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. तक्रारदाराकडे उर्वरित ५ हजार रुपये नसल्याने ते नंतर देतो, असे सांगण्यात आले. त्यास ढाकणे यांनी संमती दिल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.
या प्रकरणी ढाकणे यांना ताब्यात घेण्यात आले असून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. पथकात पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल शेखर वाघ आणि चालक पोलीस हवालदार कारंडे यांचा पथकाने केली.


