Anurag Kashyap: सिनेमाचं तिकीट खरेदी करणं आणि वोट देणं एकसारखं :अनुराग कश्यप

Anurag Kashyap : सिनेमाचं तिकीट खरेदी करणं आणि मत देणं एकसारखं असल्याचं वक्तव्य बॉलिवूड दिग्दर्शक,अभिनेता आणि निर्माता अनुराग कश्यप याने केलं आहे.

0
Anurag kashyap

नगर : सिनेमाचं तिकीट(Movie Ticket) खरेदी करणं आणि मत देणं (Voting) एकसारखं असल्याचं वक्तव्य बॉलिवूड (Bollywood) दिग्दर्शक,अभिनेता आणि निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याने केलं आहे. या वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका मुलाखती दरम्यान त्याने हे वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्याची इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे.

नक्की वाचा : कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील उठविणार आवाज

अनुराग कश्यप हा दर्जेदार सिनेमांसाठी ओळखला जातो. त्याचे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे तो चर्चेत येतो. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या सिनेमाला तो पाठिंबा देताना दिसून आला.बॉलिवूड सिनेमांच्या यशाबद्दल त्याने भाष्य केलं आहे.अनुराग कश्यप आणि सुधीर मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान त्याने सिनेमा आणि ओटीटीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा : महाराष्ट्रात वर्षाअखेर थंडी आणखी वाढणार; हवामान विभागाची माहिती

अनुराग म्हणाला,”बॉलिवूडमध्ये चांगले सिनेमे बनत नाहीत असं अनेक लोकांना वाटतं. मात्र चांगले सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर ते सिनेमागृहात जाऊन पाहण्यापेक्षा ओटीटीवर रिलीज होण्याची प्रेक्षक प्रतीक्षा करतात. सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर याचा परिणाम होतो. रिलीजच्या तीन-चार दिवसांनंतर बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात असे सिनेमे कमी पडतात. मी चांगले सिनेमे बनवले असूनही ते पाहायला कोणीही गेलेलं नाही. “तुम्ही जे खरेदी करणार तशाच पद्धतीने सिनेमे चालणार आणि तशाच पद्धतीचे सिनेमे बनणार, असल्याचे त्याने सांगितलं.

दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता अनुराग कश्यपने पांच या सिनेमाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ब्लॅक फ्रायडे, नो स्मोकिंग, देव डी, गुलाल, दॅड गर्ल ईन यलो बुट्स आणि गँग्स ऑफ वासेपूर असे त्याचे अनेक सिनेमे गाजले आहेत. सत्या या सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर वॉटर या सिनेमासाठी त्याने पटकथालेखन केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here