Armed Robbery : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे सशस्त्र दरोडा; पती-पत्नी गंभीर जखमी

शेतात वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

0
Armed Robbery : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे सशस्त्र दरोडा; पती-पत्नी गंभीर जखमी
Armed Robbery : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे सशस्त्र दरोडा; पती-पत्नी गंभीर जखमी

Armed Robbery : श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव (Kolgaon) परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून, मानमोडी परिसरातील गवळी वस्तीवर रविवार (ता. १०) मध्यरात्री सशस्त्र दरोडा (Armed Robbery) पडला. दरोडेखोरांनी केलेल्या अमानुष मारहाणीत दत्तात्रय रामभाऊ गवळी आणि त्यांची पत्नी कौशल्या गवळी हे गंभीर जखमी (Seriously Injured) झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : कर्जत नगरपंचायतीमध्ये वाहू लागले पदाधिकारी बदलाचे वारे; १३ मे ला होणार विशेष सभा

शस्त्रांचा धाक दाखवून धमकावण्यास सुरुवात

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानमोडी शिवारातील गवळी वस्तीवर दत्तात्रय रामभाऊ गवळी हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रविवार (ता. १०) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश करत घरातील सदस्यांना शस्त्रांचा धाक दाखवून धमकावण्यास सुरुवात केली. यावेळी दत्तात्रय गवळी आणि त्यांच्या पत्नी कौशल्या गवळी यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी त्यांना लाठ्या-काठ्यांनी आणि हातातील शस्त्रांनी बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती की दत्तात्रय गवळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच बेशुद्ध झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पसार (Armed Robbery)

दाम्पत्याला जखमी केल्यानंतर दरोडेखोरांनी घराची उचकापाचक केली. त्यांनी कौशल्या गवळी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबाडून घेतले. ऐवज लंपास केल्यानंतर दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. घटनेनंतर जखमींना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, दत्तात्रय गवळी यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना तातडीने पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची मृत्यूशी झुंज सुरू असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून, परिसरातील संशयित हालचालींची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे कोळगाव परिसरात भीतीचे प्रचंड वातावरण निर्माण झाले आहे. शेतात वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, बेलवंडी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून आरोपींना तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरत आहे.