
नगर : आषाढी एकादशी (Ashadhi Wari 2026) निमित्त पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकऱ्यांसाठी (Warkari)मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने विठूभक्तांना मोठा दिलासा दिला आहे. यंदा आषाढी वारीसाठी ५४ विशेष रेल्वे फेऱ्या (54 Special Train Trips) चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या विशेष गाड्यांचा समावेश असून, बहुतांश गाड्या अनारक्षित असणार आहेत.
नक्की वाचा : धार्मिक स्थळी आता सुरक्षा निर्बंध लागू ;मानवत मधील दुर्घटनेनंतर राज्यसरकारचा निर्णय
पंढरपूरला जोडणाऱ्या रेल्वे फेऱ्यांचा तपशील पुढीलप्रमाणे: (Ashadhi Wari 2026)
नागपूर – मिरज आषाढी विशेष (४ फेऱ्या) गाडी क्र. ०१२०५ विशेष नागपूरहून दि. २३ व २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ०८.५० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
पंढरपूर आगमन / प्रस्थानः सकाळी ०८.०० / ०८.२५ गाडी क्र. ०१२०६ विशेष मिरजहून दि. २४ व २५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.५५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
पंढरपूर आगमन / प्रस्थानः दुपारी ०३.५५ / ०५.०० थांबे : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहंकाळ, सलगरे आणि अरग.
रचनाः २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी (२) लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह) एकूण १८ डबे.
नवीन अमरावती पंढरपूर आषाढी विशेष (४ फेऱ्या) (Ashadhi Wari 2026)

२४ जुलै २०२६ रोजी दुपारी २.४० वाजता सुटेल व दसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
गाडी क्र. ०११२० विशेष पंढरपूरहून दि. २२ व २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता नवीन अमरावती येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
थांबेः बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डवाडी.
रचनाः २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह) १८ डबे. एकूण
खामगाव – पंढरपूर आषाढी विशेष (४ फेऱ्या)
गाडी क्र. ०११२१ विशेष खामगावहून दि. २२ व २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
गाडी क्र. ०११२२ विशेष पंढरपूरहून दि. २३ व २६ जुलै २०२६ रोजी पहाटे ५.०० वाजता सुटेल व त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजता खामगाव येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
थांबेः जळंब, नंदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्दुवाडी.
रचनाः २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह) १८ डबे. एकूण
भुसावळ पंढरपूर अनारक्षित आषाढी विशेष (४ फेऱ्या)
गाडी क्र. ०११५९ विशेष भुसावळहून दि. २४ व २५ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
गाडी क्र. ०११६० विशेष पंढरपूरहून दि. २५ व २६ जुलै २०२६ रोजी रात्री १०.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १.०० वाजता भुसावळ येथे पोहोचेल.
थांबेः जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्दुवाडी.
रचनाः १८ सामान्य द्वितीय श्रेणी डबे (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह)आरक्षण व तिकीट बुकिंग
विशेष शुल्कासह चालविण्यात येणाऱ्या आषाढी विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर उपलब्ध राहील. अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे रेल्वे स्थानकांवरील बुकिंग काउंटर तसेच अॅपद्वारे उपलब्ध असतील. प्रवाशांनी वैध तिकिटासह प्रवास करून गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


