
Athletes : मुंबई : क्रीडा क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या खेळाडूंच्या (Athletes) शिष्टमंडळाने दिनांक २५ जून रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार (Sports Minister Sunetra Pawar) यांची भेट घेतली.

नक्की वाचा : अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी २१ कोटी ३० लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी
खेळाडूंच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा
या भेटीदरम्यान खेळाडूंवर होणारा अन्याय, बोगस खेळांना दिलेल्या थेट नियुक्त्या, भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील कारवाई, क्रीडा आरक्षणातील निकषांमध्ये तातडीने बदल करणे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना थेट सरकारी नियुक्ती देणे या अत्यंत गंभीर विषयांवर सविस्तर चर्चा झाली. क्रीडामंत्री सौ. सुनेत्राताई पवार यांनी खेळाडूंच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या असून, संबंधित विषयांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे. क्रीडामंत्र्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलनकर्त्या खेळाडूंनी आपले सुरू असलेले उपोषण सध्या तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषणा(Athletes)
“क्रीडामंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही सध्या उपोषण स्थगित केले आहे. मात्र, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पुन्हा ताईसाहेबांची भेट घेऊन पुढील भूमिका निश्चित करू आणि आवश्यक भासल्यास पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारू. खेळाडूंवर होणारा अन्याय आता कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे. तसेच, या लढ्यात सर्व स्तरांतून मिळालेल्या जाहीर पाठिंब्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.


