Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; दररोज १ हजार भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पास

0
Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; दररोज १ हजार भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पास
Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; दररोज १ हजार भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पास

Bhimashankar Temple : नगर : तब्बल पावणेपाच महिन्यांपासून बंद असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी व्यवस्था सुरू केली आहे. त्याद्वारे दररोज 1 हजार भाविकांना दर्शन मिळणार आहे. 5 जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. भाविकांना मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करून दर्शन घेता येणार आहे.

हेही पहा : पोलिसांवर गोळीबार करून पसार झालेले तिघे जेरबंद

‘या’ वेळेत मिळणार दर्शन

जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 30 जून या कालावधीत ऑनलाइनद्वारे नोंदणी केलेल्या भाविकांना दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. सकाळी 11 वाजल्यानंतर दर्शन बंद करून विकासकामे सुरू केली जातील. निर्धारित वेळेत दररोज केवळ 1 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणी केलेल्या भाविकांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.

हेही वाचा : दाखल्यांसाठी पैसे मागितल्यास शाळा-कॉलेजवर कारवाई; शिक्षण विभागाचा इशारा

ऑनलाईन नोंदणी (Bhimashankar Temple)

भाविकांसाठी ऑनलाइन नोंदणी व दर्शनाची सुविधा मंदिर व्यवस्थापन समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. संकेतस्थळ https://shree bhimashankar.com याप्रमाणे आहे. प्रसिद्धीपत्रकात दर्शनासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार असल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. उपलब्ध माहितीनुसार ऑनलाइन नोंदणी व नियमित दर्शनासाठी स्वतंत्र शुल्क नसल्याचे स्पष्ट झाले आहे.