Burglary : पाथर्डी : तालुक्यातील निवडुंगे (Nivdunge) येथे घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकाटून अज्ञात चोरट्याने (Thief) घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६१ हजार ३०५ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवारी (ता.२७) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी भरत बाबासाहेब मरकड यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) फिर्याद दिली आहे.
नक्की वाचा : किरणकुमार कबाडी यांची याचिका मॅटने फेटाळली; शिर्डीला झालेली बदली कायम
घरफोडी करून चोरी केल्याचे निदर्शनास
मरकड हे पत्नी व दोन मुलांसह निवडुंगे येथे राहतात. गुरुवारी (ता.२७) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते पत्नीसमवेत पारेवाडी येथे पाहुण्यांना भेटण्यासाठी गेले होते. दुपारी साडेएकच्या सुमारास ते घरी परतले असता घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकाटलेला दिसला. घरात प्रवेश करून पाहणी केली असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले.ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेले पैसे व सोन्याचे दागिने तपासले असता ते मिळून आले नाहीत. घरात इतरत्र शोध घेतल्यानंतरही ऐवज न मिळाल्याने अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गुन्हा दाखल (Burglary)
चोरट्याने ७ ग्रॅम ४५० मिली वजनाची सोन्याची अंगठी (अंदाजे किंमत ११ हजार १७५ रुपये), ८ ग्रॅम ९७० मिली वजनाची सोन्याची अंगठी (१३ हजार ४५५ रुपये), ७ ग्रॅम ४५० मिली वजनाची आणखी एक सोन्याची अंगठी (११ हजार १७५ रुपये), १५ ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन (२२ हजार ५०० रुपये) आणि तीन हजार रुपये रोख, असा एकूण ६१ हजार ३०५ रुपयांचा ऐवज लंपास केला.या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



