Cannabis Seized : केडगावातून १८ किलो गांजा जप्त; कोतवाली पोलिसांची कारवाई

पोलीस पथकाची संबंधित परिसरात पाहणी

0
Cannabis Seized : केडगावातून १८ किलो गांजा जप्त; कोतवाली पोलिसांची कारवाई
Cannabis Seized : केडगावातून १८ किलो गांजा जप्त; कोतवाली पोलिसांची कारवाई

Cannabis Seized : नगर : केडगाव उपनगरातील वैष्णवनगर येथील तिरंगा चौक परिसरात कारवाई करत कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) तब्बल १८ किलो गांजा जप्त (Cannabis Seized) केला. या कारवाईत सुमारे १ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. विकास बाळू उमाप (वय ३५, रा. केडगाव) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

नक्की वाचा : दुष्काळसदृश्य परिस्थितीतही भगवानगडाची विहीर तुडुंब; भाविकांची उत्सुकतेपोटी गर्दी

पोलीस पथकाची संबंधित परिसरात पाहणी

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना केडगाव येथील वैष्णवनगर, तिरंगा चौक परिसरात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलीस पथकाने संबंधित परिसरात पाहणी केली. त्यावेळी गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत सुमारे १८ किलो गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे १ लाख ८२ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांच्या पथकाने केली कारवाई (Cannabis Seized)

पोलीस उपाधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंडे, रोहिणी दरंदले, राहुल शिंदे, विनोद बोरगे, साबीर शेख विशाल दळवी दीपक रोगले शिरीष तर्फे सुरज कदम सत्यम शिंदे दत्तात्रय कोतकर अतुल काजळे अमोल गाडे सचिन डोळगे महेश पवार रमेश शिंदे संकेत दिवर अतुल लाटे राहुल मासाळकर, गंगाधर आंग्रे, पल्लवी रोहकले, राहुल गुंडू, अरुण सांगळे यांच्या पथकाने केली आहे.