Chemists Association : ऑनलाइन औषधे विक्रीवर निर्बंध घालण्याची मागणी; कर्जतमध्ये मेडिकल बंद ठेवत दर्शवला विरोध

संबंधीत मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांना अनेकवेळा दिले निवेदन

0
Chemists Association : ऑनलाइन औषधे विक्रीवर निर्बंध घालण्याची मागणी; कर्जतमध्ये मेडिकल बंद ठेवत दर्शवला विरोध
Chemists Association : ऑनलाइन औषधे विक्रीवर निर्बंध घालण्याची मागणी; कर्जतमध्ये मेडिकल बंद ठेवत दर्शवला विरोध

Chemists’ Association : कर्जत : देशात आणि राज्यात सर्रासपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर इंटरनेट फार्मसी व ऑनलाईन औषध विक्री (Online Medicine Sales) मागे घेण्याबाबत कर्जत तालुका औषध विक्रेते संघाने (Chemists’ Association) बुधवारी (ता. २०) मेडिकल व्यवसाय बंद ठेवत आपला विरोध दर्शविला. याबाबत कर्जत तहसीलदार (Karjat Tehsildar) व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

नक्की वाचा : पारनेर व नगर तालुक्यातील २८ गावांना मिळाली नुकसान भरपाई; दाते यांच्या पाठपुराव्याला यश

संबंधीत मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांना अनेकवेळा दिले निवेदन

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने (AIOCD) देशात व राज्यात सर्सासपणे बेकायदेशीर रित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषधी विक्री ई-पोर्टल मागे घेण्याबाबत अनेकवेळा संबंधीत मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देत तसेच प्रत्यक्ष भेटून याबाबत शासन व प्रशासनाच्या नकारात्मक भूमिकेच्या विरोधात आखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्यावतीने विरोध दर्शवत यासह निवेदन देत बंद पाळणार असल्याचे कळविले होते. या पार्श्वभूमीवर बुधवार, (ता. २०) सर्व मेडिकल व्यावसायिकांनी आपले दुकाने बंद ठेवले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जिल्हयातील औषधी विक्रेते या बंद मध्ये सहभागी (Chemists Association)

कर्जत तालुक्यासह महाराष्ट्र राज्यातील व जिल्हयातील औषधी विक्रेते या बंद मध्ये सहभागी झाले होते. यावेळी कर्जत औषध विक्रेता संघाच्या वतीने शहरातून पायी जात कर्जत तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका औषध विक्रेते संघाचे अध्यक्ष सुरेश तोरडमल, शहराध्यक्ष नागेश खेडकर, खजिनदार विनोद यादव यांच्यासह कालिदास शिंदे, राम ढेरे, गणेश काळदाते, सुनील भोज, पप्पू तोरडमल, घनश्याम नाळे, राजेंद्र पठाडे, दिनेश ढवळे, सुदाम दळवी, रोहित शिंदे, सागर तोरडमल, शरद म्हेत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने केमिस्ट बांधव उपस्थित होते.