City Traffic Branch Action : नगर : अहिल्यानगर शहरातील डीएसपी चौकात आज वाहतूक शाखेने (City Traffic Branch Action) नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात धडक कारवाई केली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक (Traffic Branch Police Inspector) महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी वाहनांवरील ब्लॅक फिल्म, एचआरएस नंबर प्लेट, सीट बेल्टचा वापर न करणे, विनानंबर प्लेट वाहने तसेच वाहतुकीचे इतर नियम मोडणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली.

नियमभंगाला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेची मोहीम
या कारवाईत अंदाजे ३० ते ४० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरोधात यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि नियमभंगाला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने ही मोहीम राबवली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांच्या पथकाने केली कारवाई (City Traffic Branch Action)
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शमुवेल गायकवाड, रामराव शिरसाट, अन्सार शेख, पोलीस अंमलदार विष्णू खेडकर, आदिनाथ जपकर, सुरत शिंदे, ज्ञानदेव दहिफळे, गणेश आरणे, पूजा भांगरे, गहिनीनाथ दहिफळे, आबासाहेब चव्हाण यांच्या पथकाने केले आहे.




