Crime : जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे कार्यालय फोडले; तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा Crime : जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे कार्यालय फोडले; तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

0
Crime : जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे कार्यालय फोडले; तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
Crime : जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे कार्यालय फोडले; तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

Crime : नगर : जिल्हा परिषद (Ahilyanagar Zilla Parishad) अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रात (District Training Center) अज्ञात चोरट्यांनी चोरी करत २५ हजार ५०० रूपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांची सोशल मीडियावर बदनामी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोमवारी रात्री दिली फिर्याद

याबाबत डॉ. जयश्री संभा शिंदे (वय ३८, रा. विनायक नगर) यांनी सोमवारी (ता.१८) रात्री फिर्याद दिली आहे. त्या येथील जिल्हा शासकीय रूग्णालय परिसरातील जिल्हा परिषदेच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी कार्यालयातील कर्मचारी किशोर अंधारे यांनी कार्यालयाला नियमितप्रमाणे कुलूप लावले होते. त्यानंतर शनिवार (ता.१६) व रविवार (ता.१७) सुट्टी असल्याने कार्यालय बंद होते. सोमवारी सकाळी ९.४५ वाजता कर्मचारी योगेंद्र पालवे यांनी कार्यालयाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजाला आतून कडी लावलेली असल्याचे आढळून आले. तसेच कार्यालयातील एसी सुरू स्थितीत होता. यानंतर त्यांनी डॉ. शिंदे यांना माहिती दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कपाट उघडी व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले (Crime)

डॉ. शिंदे कार्यालयात आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता कार्यालयातील कपाटे उघडी व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

मागील खिडकी फोडून लोखंडी गज काढल्याचे समोर (Crime)

स्टोअर रूममधील सामान तसेच वसतिगृहातील लाईट फिटिंगचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले. कार्यालयाच्या मागील बाजूची खिडकी फोडून लोखंडी गज काढण्यात आल्याचे समोर आले. चोरट्यांनी अॅम्प्लिफायर, एलसीडी प्रोजेक्टर, कॉम्प्युटर साउंड सिस्टिम, गिझर, डीव्हीडी प्लेअर, माईक स्टँड आदी साहित्य चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.