Death : पाथर्डीत दोघांचा अकस्मात मृत्यू; कारण अस्पष्ट

वैद्यकीय अहवालानंतरच याबाबत माहिती समोर येणार

0
Death : पाथर्डीत दोघांचा अकस्मात मृत्यू; कारण अस्पष्ट
Death : पाथर्डीत दोघांचा अकस्मात मृत्यू; कारण अस्पष्ट

Death : पाथर्डी : तालुक्यात एकाला चक्कर येऊन तर दुसऱ्याला रक्ताच्या उलट्या होऊन अशा दोन जणांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या मृत्यूमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन (Minor) मुलाचा तसेच ५५ वर्षीय व्यक्तीचा समावेश असून, पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नक्की वाचा : जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा : जिल्हाधिकारी

उपचारादरम्यान मृत घोषित

मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डीत तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला गुरुवारी (ता. २३) सायंकाळी अचानक चक्कर आल्याने त्याला तत्काळ अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री १०.१५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वैद्यकीय अहवालानंतरच याबाबत माहिती समोर येणार (Death)

दुसरी घटना माळीबाभुळगाव येथे घडली असून, श्रीधर रंगनाथ तुपे (वय ५५) यांना गुरुवारी (ता. २३) दुपारी राहत्या घरी अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर त्यांना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रात्री ९.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. दोघांच्याही मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वैद्यकीय अहवालानंतरच याबाबत निश्चित माहिती समोर येणार आहे.