
नगर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांना लवकरच नवीन कार्यालयाचा पत्ता (New office address) मिळणार आहे. कारण मुंबईतील प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंग (Air India Building) आता फडणवीस यांचे नवीन कार्यालय म्हणून काम पाहणार आहे. यामुळे सरकारची २०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. महाराष्ट्र सरकारने नरिमन पॉईंट येथील समुद्रकिनारी असलेली २३ मजली एअर इंडिया बिल्डिंग १,६०१ कोटी रुपयांना खरेदी केली आहे.
नक्की वाचा : ‘पॅलेट गनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही’, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
राज्य सरकारच्या जमिनीवर बांधण्यात आली इमारत (Devendra Fadanvis)
विशेष म्हणजे, एअर इंडिया बिल्डिंग १९७४ मध्ये राज्य सरकारच्या जमिनीवर बांधण्यात आली होती. सुरुवातीला, नागरिक लिफ्टच्या प्रवासासारख्या अनुभवांसाठी या इमारतीला भेट देत असत. मात्र एअर इंडियाच्या खाजगीकरणानंतर आणि टाटा समूहाने तिचे अधिग्रहण केल्यानंतर, ही इमारत तिच्या अनावश्यक मालमत्तांसह, एअर इंडिया असेट्स होल्डिंग लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आली.
अवश्य वाचा : आता शाळेच्या आवारात वडापाव, समोसा, बर्गर विक्रीवर बंदी;आयएएस तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय
मंत्रालयाबाहेर असलेले सगळे विभाग एअर इंडिया इमारतीत (Devendra Fadanvis)
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालया व्यतिरिक्त, मंत्रालय इमारतीबाहेर कार्यरत असलेले सर्व सरकारी विभागही या इमारतीत स्थलांतरित केले जातील. यामुळे भाड्यात २०० कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे. सध्या, १९५५ मध्ये बांधलेल्या सचिवालयात जागेच्या तीव्र कमतरतेमुळे, राज्य सरकारला जवळपासच्या परिसरात सुमारे ९ लक्ष चौरस फूट जागा भाड्याने घ्यावी लागली आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सर्वात वरच्या मजल्यावर असेल, तर कॅबिनेट हॉल २२व्या मजल्यावर १३,३६३ चौरस फूट जागेत असेल.


