Corona News Update | नगर : राज्यात पुन्हा करून वाढू लागला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कोरोनाची लागण झाली. राज्याच्या आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यात यावर माहिती देत राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केले.
हे पहा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत. पण अपेक्षा करूया की, याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. गेल्या काही वर्षात लोकांना अनुभव आला आहे, जनतेने याचा त्रास झाला आहे. त्यामुळे आता कसं वागायचं याबाबत लोकांना माहिती आहे. सार्वजनिक ठिकाणी नाताळ असो वा नवीन वर्ष, लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा : Cricket : एस.के. क्रिकेट अकॅडमी व समर्थ क्रिकेट अकॅडमी ठरली अजिंक्य
महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 50 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 9 JN.1 व्हेरिएंटचा समावेश आहे. JN.1 चे व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सरकारने आरोग्य अधिकाऱ्यांना सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर आणि अन्य आवश्यक उपकरणांची सुविधा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना व्हायरसच्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सर्व नमुने पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.