Discovery of Inscriptions : मांडवगण येथे १६ व्या शतकातील २ ऐतिहासिक शिलालेखांचा शोध; यादव देशमुख घराण्याचा इतिहास उजेडात

'भूतेश आख्यान' ग्रंथात मळोजीराजांच्या शौर्याचे कौतुक

0
Discovery of Inscriptions : मांडवगण येथे १६ व्या शतकातील २ ऐतिहासिक शिलालेखांचा शोध; यादव देशमुख घराण्याचा इतिहास उजेडात
Discovery of Inscriptions : मांडवगण येथे १६ व्या शतकातील २ ऐतिहासिक शिलालेखांचा शोध; यादव देशमुख घराण्याचा इतिहास उजेडात

Discovery of Inscriptions : नगर : श्रीगोंदा तालुक्यात असणाऱ्या मांडवगण कात्राबाद येथील सिद्धेश्वर मंदिराच्या (Siddheshwar Temple) उत्तरेस, वेताळ बाबांच्या टेकडीवरील मंदिराशेजारी १६ व्या शतकातील दोन महत्त्वाचे शिलालेख आढळून (Discovery of Inscriptions) आले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध शिलालेख संशोधक अनिल दुधाणे व अथर्व पिंगळे यांनी या २-३ ओळींच्या समाधिलेखांचे यशस्वी वाचन केले असून, यामुळे मांडवगण परिसराच्या मध्ययुगीन इतिहासावर (medieval history) नवा प्रकाश पडला आहे.

नक्की वाचा : आशा स्वयंसेविकेच्या पतीमुळे वाचले चिमुरडीचे प्राण; श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील घटना

शिलालेखाचा अर्थ

पहिल्या शिलालेखात श्री वेताळ देवतेवर दृढ श्रद्धा असणारे मळोजी पाटील यादव भोपतराव यांचा यात उल्लेख आहे. तसेच मांडवगण येथील गावव्यवस्थेतील अधिकारी म्हणून ‘यादव देशमुख’ व ‘मुकादम’ अशी त्यांची नोंद आहे. तर दुसऱ्या शिलालेखात राजेश्री बजाजी यांचे पुत्र चांदजी भापकर यांचा उल्लेख असून, ते मांडवगण येथील दिवाण व मोठे सावकार (महसूल अधिकारी) असावेत, असा उल्लेख आहे. हा शिलालेख काही प्रमाणात मोडतोड झालेला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भूपतीराव मळोजीराजांचा इतिहास (Discovery of Inscriptions)

‘भूतेश आख्यान’ ग्रंथानुसार, सोळाव्या शतकात यादववंशी घराण्यातील भूतोजीराजे यांच्या पोटी मळोजीराजांचा जन्म झाला. ते वेताळ महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या शौर्याचे अनेक थक्क करणारे किस्से इतिहासात प्रसिद्ध आहेत. अहमद निजामशाहाच्या दरबारात त्यांनी अजिंक्य मल्लाला हरवले, तसेच भुकेल्या वाघाची शेपूट धरून त्याला फेकून दिले आणि हत्ती व सुसर यांचाही थरारक पराभव केला. तोफांच्या सरावावेळी मळोजींनी शत्रूने डागलेले जळते गोळे चेंडूसारखे हातात पकडले होते.

‘भूतेश आख्यान’ ग्रंथात मळोजीराजांच्या शौर्याचे कौतुक

हा चमत्कार पाहून बादशहाने त्यांना ‘भूपतीराव’ हा किताब दिला. कवी सुजाणभट यांनी ‘भूतेश आख्यान’ ग्रंथात मळोजीराजांच्या या अद्भूत शस्त्रविद्येचे आणि शौर्याचे कौतुक केले आहे. या शिलालेखांच्या शोध आणि संकलनाचे कार्य अनिल दुधाणे यांनी केले असून, यात त्यांना अभयसिंह राजे यादव देशमुख भोपतराव (सुलतानपूर नेवासा) आणि शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.