District Bank : कोल्हेंचा जिल्हा बँक बिनविरोधचा मार्ग मोकळा; पिता-पुत्राचे अर्ज वैध, दोघांपैकी कोण थांबणार?

कोल्हे कुटुंबातील नक्की कोण प्रतिनिधित्व करणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात

0
District Bank : कोल्हेंचा जिल्हा बँक बिनविरोधचा मार्ग मोकळा; पिता-पुत्राचे अर्ज वैध, दोघांपैकी कोण थांबणार?
District Bank : कोल्हेंचा जिल्हा बँक बिनविरोधचा मार्ग मोकळा; पिता-पुत्राचे अर्ज वैध, दोघांपैकी कोण थांबणार?

District Bank : नगर : जिल्हा बँकेसाठी (District Bank) कोपरगाव सोसायटी मतदारसंघातून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे (Bipin Kolhe) आणि आमदार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांचे अर्ज वैध ठरले असून इतर अर्ज अवैध ठरल्याने कोल्हे यांचा जिल्हा बँकेचे संचालक म्हणून बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन अर्ज कोल्हे कुटुंबातून असल्याने आगामी काळात कोणता अर्ज मागे घेतला जाणार आणि कोणाची वर्णी संचालक म्हणून या मतदारसंघातून लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नक्की वाचा : नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा होणार; मात्र अनावश्यक वापराला महापालिका घालणार आळा

इतर अर्ज अवैध

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कोपरगाव सोसायटी मतदारसंघातून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि आमदार विवेक कोल्हे यांचे अर्ज वैध ठरले असून इतर अर्ज अवैध ठरल्याने कोल्हे यांचा जिल्हा बँकेचे संचालक म्हणून बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन अर्ज कोल्हे कुटुंबातून असल्याने आगामी काळात कोणता अर्ज मागे घेतला जाणार आणि कोणाची वर्णी संचालक म्हणून या मतदारसंघातून लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कोण करणार प्रतिनिधित्व? (District Bank)

बिपीन कोल्हे यांचा चौफेर अभ्यासाचा आवाका आणि सहकार क्षेत्रात असलेली जाण ही अतिशय व्यापक आहे तर आमदार विवेक कोल्हे यांच्याकडे असणारी नाविन्यतेची जिद्द व बहुआयामी अभ्यासाची क्षमता यातून जिल्हा बँकेच्या दृष्टीने आगामी काळात कोल्हे कुटुंबातील नक्की कोण प्रतिनिधित्व करणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.सबंध जिल्ह्याचे लक्ष लागलेली अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक निवडणूक मोठ्या नाट्यमय घडामोडी घडून पुढे जाते आहे. बिनविरोधाचे वारे वाहू लागले असताना अचानक निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची देखील चर्चा जोर धरत असताना अनेक मतदारसंघात बहुतेकांचे मार्ग मोकळे झाले असून कोल्हे कुटुंबांचे जिल्हा बँकेच्या राजकारणात असलेले महत्व पाहता कोपरगाव मधून दोनच अर्ज वैध ठरल्याने अंतिम नाव कुणाचे ठेवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here