Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : पारनेर : “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा महामंत्र देऊन कोट्यवधी शोषितांच्या आयुष्यात प्रकाशाची पहाट निर्माण करणाऱ्या, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) पारनेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय जनता पार्टी (BJP), पारनेर तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित अभिवादन सभेत भाजप महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य विश्वनाथ कोरडे (Vishwanath Korde) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नक्की वाचा : अशोक खरातला खाऊ घातले ‘शेणाचे लाडू’; अहिल्यानगरमध्ये अनोखे आंदोलन
बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार
ते म्हणाले की, “विद्वत्ता ही तलवारीच्या धारेपेक्षाही तीक्ष्ण असते आणि जेव्हा ती मानवतेच्या कल्याणासाठी वापरली जाते, तेव्हाच ती सार्थ ठरते. बाबासाहेबांचे हेच विचार डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी सदैव कार्यरत आहे. समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची जोपासना करून प्रगत व समृद्ध भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध होऊया.” या कार्यक्रमादरम्यान पारनेर तालुक्यातील भाजप परिवारातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि न्याय पोहोचवणे हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)
या प्रसंगी तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुभाषराव दुधाडे, शंकरराव नगरे, दत्ता नाना पवार, कल्याणराव थोरात.शिवाजी काका खिलारी, राजेंद्र उबाळे, दादाभाऊ वारे.प्रभावतीताई मोरे, सोनालीताई आंबेकर, लहू भालेकर, मधुकर पठारे. प्रमोद कावरे, नगरसेवक अशोक चेडे, ॲड.तुषार औटी, मनोज मुंगसे दिनेशराव बाबर, रमेश गाडगे, अर्जुनराव नवले, कानिफनाथ ठुबे. समीर झगडे, प्रथमेश मोरे, भरत ठुबे, सुजित मुळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकास अभिवादन केले. संपूर्ण परिसरात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ आणि ‘जय भीम’च्या घोषणांनी वातावरण चैतन्यमय झाले होते. पारनेर तालुक्यातील भाजपच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक सलोख्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.



