Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : पाथर्डी : भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) पाथर्डी शहरात सामाजिक न्याय विभाग व समाजकल्याण संचलनालयांतर्गत चालविण्यात येणाऱ्या विविध विद्यार्थी वसतिगृहांच्या (Student Hostels) वतीनेप्रभात फेरी व रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन आरपीआय (RPI) (आठवले गट) यांच्या वतीने करण्यात आले होते.
नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू

वस्तीगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
मंगळवारी (ता. १४) सकाळी पाथर्डी पंचायत समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रभात फेरीस सुरुवात करण्यात आली. पंचायत समितीपासून निघालेल्या रॅलीचा नाईक चौक, अजंठा चौक, क्रांती चौक मार्गे कोरडगाव रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.
या प्रभात फेरीत श्री आदर्श नगर, मिलिंद, संत गाडगे महाराज, नाथुजी कापसे, लोकनेते, श्री आनंद, हिंद, संजय गांधी, धनंजय, गर्भगिरी, कृष्णप्रताप तसेच कन्या छात्रालयातील विद्यार्थी व अधिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच आरपीआय (आठवले गट) व पाथर्डी तालुक्यातील सर्व अनुदानित मागासवर्गीय वस्तीगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.रॅलीदरम्यान जय भीम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची फलके घेत समाजप्रबोधनाचा संदेश दिला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गीतांनी परिसर मंत्रमुग्ध (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)
या रॅलीत विद्यार्थ्यांचे बँड पथक व विविध गायन पथकांनी रंगत आणली. भारत गाडेकर व बिपिन खंडागळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गीतांनी परिसर मंत्रमुग्ध झाला होता. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेतील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या संदेशाचा प्रसार करत सामाजिक समतेचा जागर केला.यावेळी आरपीआयचे तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू, भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय बडे, आरपीआय जिल्हा सरचिटणीस रवींद्र आरोळे, सुरेश भागवत, भाऊसाहेब बर्फे, लाबान पगारे, सुंदरदास कांबळे, महेंद्र राजगुरू, इंद्रजीत शिंदे, नाना पगारे, महेश अंगरखे, वाल्मीक नरवडे, प्रदीप वरखेडकर, पोपट पारखे, वसंत घुगरे, सुभाष घुगे, नवनाथ शिरसाट, पांडुरंग बडे, अनंता खाडे, रमेश खेडकर, अंबादास वनवे आदी मान्यवर उपस्थित होते.



