Dr. Sujay Vikhe : मनपाचे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल राज्यातील महानगरपालिकांमधील सर्वात उत्कृष्ट हॉस्पिटल ठरेल : डॉ.सुजय विखे

Dr. Sujay Vikhe : मनपाचे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल राज्यातील महानगरपालिकांमधील सर्वात उत्कृष्ट हॉस्पिटल ठरेल : डॉ.सुजय विखे

0
Dr. Sujay Vikhe : मनपाचे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल राज्यातील महानगरपालिकांमधील सर्वात उत्कृष्ट हॉस्पिटल ठरेल : डॉ.सुजय विखे
Dr. Sujay Vikhe : मनपाचे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल राज्यातील महानगरपालिकांमधील सर्वात उत्कृष्ट हॉस्पिटल ठरेल : डॉ.सुजय विखे

डॉ.सुजय विखे व आ.संग्राम जगताप यांनी केली हॉस्पिटलच्या कामाची पाहणी

Dr. Sujay Vikhe : अहिल्यानगर : आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली नगर शहराची वेगाने वीकासात्म्क प्रगती होत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) हे पूर्ण ताकदीने आ.जगताप यांच्या मागे उभे आहेत. महानगरपालिकेच्या जिजामाता भोसले मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी यासाठी निधी दिला. शहरामध्ये गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत चांगल्या दर्जेदार अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने उभारण्यात आलेले हे राजमाता जिजाऊ भोसले मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल राज्यातील महानगरपालिकांमधील सर्वात उत्कृष्ट हॉस्पिटल ठरेल, असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांनी व्यक्त  केले.

नक्की वाचा: पाथर्डीत लाच घेताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

भव्य चार मजली हॉस्पिटलच्या कामाची पाहणी

भोसले आखाडा येथे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य चार मजली राजमाता जिजाऊ भोसले मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या कामाची पाहणी बुधवारी सायंकाळी डॉ.सुजय विखे व आ.संग्राम जगताप यांनी केली. यावेळी डॉ.विखे यांनी विविध सूचना केल्या. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, महेश लोंढे, रोहन सानप, अभिजित बोरुडे, मनपा आरोग्याधिकारी डॉ.सतीश राजूरकर, शहर अभियंता मनोज पारखे आदींसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आ.संग्राम जगताप म्हणाले, (Dr. Sujay Vikhe)

अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्वमालकीचे मोठे अद्ययावत हॉस्पिटल व्हावे ही बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती ती आता पूर्णत्वास येत आहे. या हॉस्पिटलच्या उर्वरित कामासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोठे सहकार्य केले आहे. माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी या कामाची पाहणी करून काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. लवकरच या हॉस्पिटलचे लोकार्पण होईल.

येत्या १ मे ला महाराष्ट्रदिनी शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होणार आहेत. यामध्ये नेहरू मार्केटचे भूमिपूजन, सावेडी बसस्थानकचे भूमिपूजन, तारकपूर रस्त्यावरील पथदिव्यांचे उद्घाटन, तसेच हरितनगर प्रकल्पाअंतर्गत व्रुक्षारोपण आदी महत्वाचे कामे होणार आहेत. यावेळी डॉ.सतीश राजूरकर यांनी हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या विविध अद्ययावत सुविधांची सविस्तर माहिती दिली. सुभाष गांधी यांनी सर्वांचे स्वागत केले.