Dr. Sujay Vikhe Patil : नाकारलं तेव्हाही दुःख झालं नाही, स्वीकारतायत याचाही आनंद नाही!; डॉ. सुजय विखे पाटलांनी भूमिका केली स्पष्ट

Dr. Sujay Vikhe Patil : नाकारलं तेव्हाही दुःख झालं नाही, स्वीकारतायत याचाही आनंद नाही!; डॉ. सुजय विखे पाटलांनी भूमिका केली स्पष्ट

0

Dr. Sujay Vikhe Patil : नगर : मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) वेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. आता विरोधात भूमिका घेणारे विखे पाटलांच्या बाजूने भूमिका मांडत आहेत. अहिल्यानगर शहरातील काही भागात मुस्लिम बांधवांना (Muslim Community) ईदच्या फ्लेक्सवर सुजय विखे पाटलांचे फोटो लावले आहेत. या संदर्भात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतःची भूमिका मांडली.

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की,

कोणी काय केले हे मला माहिती नाही. जर एखाद्या विशिष्ट समाजाने माझे बोर्ड लावले असतील तर त्यावर उठणाऱ्या प्रश्नांना उत्तर त्यांनी देणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत एका विशिष्ट समाजाने मला नाकारले. तेव्हा त्यांना कोणी विचारायला गेले नाहीत की, तुम्ही का नाकारले किंवा मलाही विचारले नाही की, तुम्हाला का नाकारले गेले. आज जर कोणी स्वीकारत असेल तर ते मला कशाला विचारता, असा मिष्कील प्रश्नही त्यांनी विचारला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ते पुढे म्हणाले, (Dr. Sujay Vikhe Patil)

त्यांनी भूमिका का बदलली याबाबत त्यांना विचारायला हवे. मी अनेक वेळा सांगितले की, माझे काम अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्याचे आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले सर्व जण आम्ही एकत्रितपणे काम करणार आहोत.

माझ्या एखाद्या गोष्टीचा वाद करणे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणे चुकीचे आहे. मी जेव्हा नाकारलो गेलो त्याचे मला कधी दुःख झाले नाही आणि आज मला कोणी स्वीकारत असेल तर त्याचा मला आनंदही नाही. मी अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेसाठी काम करतो. माझा लोकसभा निवडणुकीत पराभव जरी झाला असला तरी जिल्ह्यातील साकळाई योजनेसह विविध ठिकाणचे पाणी प्रश्न, कुकडीचे नूतनीकरण कामे करायची आहेत. जिल्ह्यातील विकासकामांसाठी पदे असणे आवश्यक आहे, असे नाही. हा माझा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील युवक, शेतकरी, महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जात, धर्म विरहित मी काम करतो. हा माझा स्वभाव आहे, त्यामुळे मी पूर्वी कोणाला आवडत होतो अथवा आवडत नव्हतो, कोण माझा मित्र झाला, कोण माझी शत्रू झाला याच्याशी मला देणे घेणे नाही. मी त्यादृष्टीकोनातून राजकारण करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.