Robbery suspect arrested : घारगाव हद्दीत लुटमार करणाऱ्या टोळीतील एक आरोपी जेरबंद; जबरी चोरीसह चैन स्नॅचिंगचे तीन गुन्हे उघड

Robbery suspect arrested : घारगाव हद्दीत लुटमार करणाऱ्या टोळीतील एक आरोपी जेरबंद; जबरी चोरीसह चैन स्नॅचिंगचे तीन गुन्हे उघड

0
Robbery suspect arrested : घारगाव हद्दीत लुटमार करणाऱ्या टोळीतील एक आरोपी जेरबंद; जबरी चोरीसह चैन स्नॅचिंगचे तीन गुन्हे उघड
Robbery suspect arrested : घारगाव हद्दीत लुटमार करणाऱ्या टोळीतील एक आरोपी जेरबंद; जबरी चोरीसह चैन स्नॅचिंगचे तीन गुन्हे उघड

Robbery suspect arrested : नगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात लुटमार करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला (Robbery suspect arrested) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. दिनेश राजाराम जाधव (वय २५, रा. कौठे बु., ता. संगमनेर) असे अटक (Arrested) केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण ४१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीच्या चौकशीत जबरी चोरी व चैन स्नॅचिंगचे आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

१८ ऑगस्ट रोजी रात्री संतोष सखाराम देवकाते (वय ४०, रा. चितळकरवस्ती, साकूर) हे बिरोबा मंदिर, साकूर येथे रस्त्याच्या कडेला कार उभी करून त्यात झोपले होते. त्यावेळी दोन अज्ञात आरोपींनी त्यांना दमदाटी करून मारहाण केली आणि रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला होता. याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पो.नि. संतोष मुटकुळे यांच्या पथकाचा तपास (Robbery suspect arrested)

अहिल्यानगर जिल्ह्यातील उघडकीस न आलेले मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार करून तपास सुरू केला.

गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असताना, २६ ऑगस्ट रोजी दिनेश जाधव हा घारगावकडून कौठे-वनकुटे रस्त्याने मोटारसायकलवरून घरी जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार कौठे-वनकुटे रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला.
संशयित जाधव पोलिसांच्या नजरेस पडताच त्याने दुचाकी रस्त्यावर टाकून नाल्यातून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ हजार १०० रुपये रोख, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि ३० हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची दुचाकी असा एकूण ४१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता जाधवने हा गुन्हा नवनाथ उर्फ दगड्या भाऊसाहेब मधे (रा. वांगदरी पिंपळदरी, ता. अकोले) याच्यासोबत केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मधे हा सध्या फरार आहे.


चौकशीत आरोपीने जुलै महिन्यात बोटा गावातील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावल्याची तसेच काही दिवसांपूर्वी सकाळच्या वेळी माऊली घाट परिसरात पाणी पिण्याचा बहाणा करून एका वृद्ध महिलेच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याची माहिती दिली.bया तपासातून घारगाव पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड तसेच पोलिस अंमलदार गणेश लोंढे, विष्णू भागवत, रिचर्ड गायकवाड, फुरकान शेख, प्रशांत राठोड, भगवान सानप, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, निळकंठ कारखेले, अरुण मोरे आणि वंदना मोढवे यांच्या पथकाने केली.