
Drishyam : The Conclusion : बॉलीवुड (Bollywood) बहुप्रतिक्षित क्राइम-थ्रिलर फ्रँचायझी ‘दृश्यम’ (Drishyam) आता आपल्या अंतिम अध्यायाकडे वाटचाल करत आहे. अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘दृश्यम द कन्क्लूजन’ (Drishyam : The Conclusion) या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा विजय साळगावकरची कथा पुढे जाणार आहे. मात्र, यावेळी त्याच्यासमोरचं आव्हान आधीपेक्षा अधिक मोठं असणार आहे.
दोन्ही व्यक्तिरेखांमधील संघर्ष
चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता जयदीप अहलावत क्राइम ब्रँच अधिकारी राजवीर सिंह तोमरची भूमिका साकारत आहे. राजवीरचे लक्ष्य विजयने तयार केलेल्या कथेमागचं सत्य शोधणं हे आहे. त्यामुळे या दोन्ही व्यक्तिरेखांमधील संघर्ष हा चित्रपटाच्या कथानकाचा सर्वात महत्त्वाचा भाग ठरणार आहे.
‘दृश्यम द कन्क्लूजन’ हा जयदीप अहलावतसाठी विशेष आहे. कारण या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ज्यांच्यासोबत काम केलं होतं, त्या अजय देवगणसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. जयदीपने कारकिर्दीच्या सुरुवातीला अजय देवगणसोबत ‘आक्रोश’ या चित्रपटात काम केलं होतं. आता अनेक वर्षांनंतर हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा एकाच चित्रपटात दिसणार आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
‘आक्रोश’ ते ‘दृश्यम द कन्क्लूजन’; जयदीपचा प्रवास!(Drishyam : The Conclusion)
अजय देवगणसोबत पुन्हा काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना जयदीप अहलावतने हा क्षण आपल्या संपूर्ण प्रवासाचं एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखा असल्याचं म्हटलं. मात्र, त्याच्यासाठी हा अनुभव केवळ ‘आक्रोश’नंतर किती वर्षे उलटली यापुरता मर्यादित नाही. एका कलाकाराच्या रूपात झालेला बदल आणि मिळालेला अनुभव यांच्याशीही तो या संधीला जोडतो. जयदीप म्हणाला, “निश्चितच, हा क्षण संपूर्ण प्रवासाचं एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखा वाटतो. पण मी याकडे केवळ किती वर्षे उलटली या दृष्टिकोनातून पाहत नाही. ‘आक्रोश’च्या वेळी जो माणूस होतो आणि आज जो माणूस आहे, त्या दोघांचा मी विचार करतो. खरी दरी तिथेच आहे.”
‘आक्रोश’मध्ये काम केलं, तेव्हा आपण चित्रपटसृष्टीत नुकतंच पाऊल ठेवत होतो, असंही जयदीपने सांगितलं. त्या काळात सेटवर स्वतःला सहजपणे व्यक्त करणं आणि इंडस्ट्रीमध्ये आपली जागा निर्माण करणं तो शिकत होता. एक कलाकार म्हणून शिकण्याचा आणि स्वतःला समजून घेण्याचा तो काळ होता. आज मात्र अनेक वर्षांच्या अनुभवातून तो वेगळ्या आत्मविश्वासासह आणि अभिनयाची अधिक प्रगल्भ समज घेऊन अजय देवगणसोबत काम करत आहे. त्यामुळे आता दोन्ही कलाकार एकमेकांसमोर उभे राहण्याचा अनुभव त्याच्यासाठी पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचं त्याने स्पष्ट केलं.
दमदार कलाकारों से सजी है ‘दृश्यम द कन्क्लूजन’!
अजय देवगणच्या सातत्याने प्रभावित आहे जयदीप!
या संवादादरम्यान जयदीप अहलावतने अजय देवगणच्या अनेक वर्षांपासून कायम असलेल्या सातत्याचं आणि त्यांच्या अभिनयाच्या खास शैलीचंही कौतुक केलं. अजय देवगण आपल्या अभिनयातून गरजेपेक्षा अधिक काही दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत, असं जयदीपने सांगितलं. जयदीपच्या मते, अजय देवगण दृश्य, व्यक्तिरेखा आणि प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास ठेवतात. प्रत्येक भावना संवादातून स्पष्ट करण्याऐवजी ते प्रेक्षकांना स्वतः ती परिस्थिती अनुभवण्याची आणि समजून घेण्याची संधी देतात.
जयदीप म्हणाला, “अजय सरांमध्ये इतक्या वर्षांपासून जी गोष्ट कायम राहिली आहे, ती म्हणजे त्यांचा संयमी अभिनय. आपण अभिनय करत आहोत हे प्रेक्षकांना दाखवण्यात त्यांना रस नसतो. ते दृश्य आणि व्यक्तिरेखेवर विश्वास ठेवतात. त्याचबरोबर प्रेक्षकांवरही इतका विश्वास ठेवतात की नेमकं काय घडत आहे, हे ते स्वतः समजून घेतील.”
जयदीपचं हे वक्तव्य चित्रपटातील दोन्ही कलाकारांमधील संघर्ष अधिक रंजक ठरण्याची शक्यता दर्शवतं. एका बाजूला विजय साळगावकर आहे, जो आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तयार केलेली कहाणी कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला राजवीर सिंह तोमर आहे, जो विजयच्या भूतकाळातील एक-एक थर उलगडत सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चित्रपटात दोन्ही कलाकारांच्या अभिनयशैलीतील आमनासामनाही पाहायला मिळणार आहे. अजय देवगण आपल्या शांत आणि संयमी शैलीत विजयची व्यक्तिरेखा साकारताना दिसतील. तर जयदीप अहलावतचा पोलिस अधिकाऱ्याचा दमदार अवतार कथेतला तणाव आणि उत्कंठा आणखी वाढवताना दिसणार आहे.
दमदार कलाकारांची फौज ‘दृश्यम द कन्क्लूजन’मध्ये!
‘दृश्यम द कन्क्लूजन’चं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. चित्रपटात अजय देवगण आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, प्रकाश राज, कमलेश सावंत, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची प्रस्तुती स्टार स्टुडिओ18 करत असून पॅनोरमा स्टुडिओजने चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिषेक पाठक, आमिल कीयन खान आणि परवेज शेख यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर अलोक जैन, अजित अंधारे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक हे चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘दृश्यम द कन्क्लूजन’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे


