EETHA Movie New Song : ‘ईठा’मधील ‘जी जी रे जी’ गाण्याच्या टीझरची झलक आली समोर; संपूर्ण गाणं उद्या होणार रिलीज!

0
EETHA Movie New Song : ‘ईठा’मधील ‘जी जी रे जी’ गाण्याच्या टीझरची झलक आली समोर; संपूर्ण गाणं उद्या होणार रिलीज!

नगर : मॅडॉक फिल्म्स आणि कठपुतली क्रिएशन्स यांनी त्यांच्या आगामी भव्य म्युझिकल ड्रामा ‘ईठा’मधील (EETHA Movie New Song) ‘जी जी रे जी’ (Ji Ji Re Ji) या गाण्याचा टीझर (Song Teaser) प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या टीझर मधून चित्रपटाच्या रंगतदार संगीत विश्वाची एक खास झलक पाहायला मिळते. श्रद्धा कपूर ‘ईठा’च्या भूमिकेत झळकणार असून, या गाण्यातून एका अशा कलाकाराचा जिद्दीचा प्रवास, तिचा नजाकतदार अंदाज आणि अफाट ताकद अनुभवायला मिळते, जिने पुढे जाऊन एक दंतकथा म्हणून आपली ओळख निर्माण केली.

नक्की वाचा : रिंकू राजगुरूच्या नजरेतून दिसणार स्त्रीच्या संघर्षाची नवी कहाणी; ‘जिजाई’चा ट्रेलर प्रदर्शित!

गाण्याला श्रेया घोषालचा स्वरसाज (EETHA Movie New Song)

राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी गाण्याला शब्दबद्ध केलं असून, श्रेया घोषाल यांच्या सुरेल आवाजाने त्याला चार चाँद लावले आहेत. म्हणजेच संगीत विश्वातील दिग्गजांची भन्नाट टीम या गाण्यासाठी एकत्र आली आहे. वैभवी मर्चंट यांच्या दमदार कोरिओग्राफीने सजलेल्या या गाण्यात श्रद्धा कपूर एका आकर्षक पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. तिच्या नृत्यातील नजाकत, भावपूर्ण डान्स मूव्ह्ज, मोहक अदाकारी आणि स्टेजवरची जबरदस्त उपस्थिती गाण्याला एक वेगळीच रंगत आणते.

अवश्य वाचा : पुण्यातील शिवाजीनगर आगाराची मोठी झेप! १६७ बसेसचा ७० हजार १९२ किलोमीटरचा प्रवास

४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपट होणार प्रदर्शित (EETHA Movie New Song)

 ‘ईठा’मध्ये संगीत हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून, ते कथानकाचा अविभाज्य भाग आहे. गाण्यांच्या माध्यमातून चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेच्या भावना, स्वप्नं, महत्त्वाकांक्षा आणि तिचा प्रेरणादायी प्रवास प्रभावीपणे उलगडला जाणार आहे. ‘जी जी रे जी’च्या टीझरने तर आत्ताच उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान, लक्ष्मण उतेकर आणि करिश्मा शर्मा यांनी केली आहे. ‘ईठा’ येत्या ४ डिसेंबर २०२६रोजी देशभरातील चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.