नगर : ‘फडणवीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका, तुम्ही चुकीच्या माणसाला खेटताय, तुमचा सुपडासाफ होईल’, असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा राज्याचा दौरा करत आहेत. दरम्यान, रविवारी (ता. १०) त्यांनी परभणी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी बोलतांना त्यांनी फडणवीस यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला.
नक्की वाचा : महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींची महिलांना मोठी भेट
परभणीच्या मानवत शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानात रविवारी मनोज जरांगे यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकल मराठा समाजाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
अवश्य वाचा : महिला दिनी केदार शिंदेंची मोठी घोषणा;’आईपण भारी देवा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
फडवणीस मला संपवणार आहेत -मनोज जरांगे
नऊ वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी मारली, तिच्यात तुम्हाला तुमची मुलगी दिसत नाही का ? असा सवाल जरांगेंनी फडणवीसांना विचारला. महत्वाचे म्हणजे फडणवीस मला संपवणार आहेत. त्यांना देव मानणाऱ्या एकाने मला सांगितले, असा गौप्यस्फोट जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच “छगन भुजबळ आठ दिवसापासून गार पडले आहेत. हिमालयात जाऊन बसले आहेत का? असे म्हणत मनोज जरांगे यांनी भुजबळांना डिवचले आहे.