नगर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या वतीने अखेर कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित (First installment of loan waiver disbursed) करण्यात आला आहे. ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ५०२९ कोटी रुपये ट्रान्स्फर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात हस्तांतरीत केली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच कर्जमाफी (Farm Loan Waiver) योजनेचा दुसरा हप्ताही लवकरच वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगरमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार; ५२३ भावांनीच लाटले पैसे
शेतीला मिळणार आर्थिक बळ (Farm Loan Waiver)

आता राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळणार आहे. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अजून पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवरही लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात येणार,अशी माहिती यावेळी देण्यात आली.
अवश्य वाचा : पुणेकरांच्या वाहनावर आता ‘MH 12 ZZ’ कायम राहणार! गडकरींची भेट घेत मुरलीधर मोहोळ यांनी काढला तोडगा
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Farm Loan Waiver)
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे की, आपण अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी घोषित केली होती. त्या अंतर्गत पहिली यादी घोषित करण्यात आली होती. घोषित केलेली यादी सर्व ग्रामपंचायतींना पाठवली. साध्या पद्धतीने शेतकऱ्यांनी आधार ऑथेंटिकेशन करायचे. अर्ज नाही. बाकी काही नाही. त्यांची खाती निल करायची, अशा पद्धतीचे काम हाती घेतले होते. आज जवळपास ५ हजार २९ कोटी रुपये ६ लाख २०२२ शेतकऱ्यांच्या खात्यात लाभ गेला आहे. ही खाती निल झाली आहेत.
कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया किती दिवसांत होईल? (Farm Loan Waiver)
“शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया ही एका महिन्यात होईल. मात्र, आपला जुना असा अनुभव असा आहे की, आपलं जवळपास ८० टक्के काम हे एका महिन्यात होतं. मात्र, २० टक्के कामाला वेळ लागतो. यामध्ये काही शेतकऱ्यांची अडचण असते, तर कुठे बँकांची अडचण असते. काही ठिकाणी आणखी काही अडचणी असतात. त्यामुळे कधी-कधी जास्त वेळ लागतो”,असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.



