Farmers’ Day : डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उद्या ‘शेतकरी दिन’ होणार साजरा 

राज्यभरात विविध कृषी महोत्सवांचे आणि शेतकरी मेळाव्यांचे आयोजन

0
Farmers' Day : डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उद्या 'शेतकरी दिन' होणार साजरा 
Farmers' Day : डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उद्या 'शेतकरी दिन' होणार साजरा 

Farmers’ Day : नगर : सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (Dr. Vitthalrao Vikhe Patil) यांच्या स्मरणार्थ उद्या, (ता. २७) राज्यभरात ‘शेतकरी दिन’ (Farmers’ Day) साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भात कृषी विभागाच्या (Agriculture Department) वतीने शेतकऱ्यांसाठी विविध उपयुक्त व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालय व मंत्रालयीन स्तरावरून देण्यात आल्या आहेत.

नक्की वाचा : १०० वे साहित्य संमेलन मराठी भाषेच्या दीर्घ आणि समृद्ध प्रवासाचा सुवर्णक्षण असेल : योगेश सोमण

शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर शिबिरे

दरवर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्य सरकारकडून त्यांचा जयंती दिन हा ‘शेतकरी दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर शिबिरे आणि आधुनिक तंत्रज्ञान विषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी तळागाळातील शेतकऱ्यांना एकत्र आणून, त्यांच्या हक्कासाठी देशातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची म्हणजेच सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. कृषी आणि सहकाराची योग्य सांगड घालूनच ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधता येतो, हा आदर्श त्यांनी देशासमोर ठेवला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राज्यभरात शेतकरी मेळाव्यांचे आयोजन (Farmers’ Day)

या ‘शेतकरी दिना’च्या निमित्ताने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी सहकार व कृषी क्षेत्रात केलेल्या क्रांतीकारी कार्याचे स्मरण व्हावे, तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व प्रयोगशील कार्य करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान व्हावा, या हेतूने राज्य सरकारने हा विशेष दिन साजरा करण्याची गौरवशाली परंपरा सुरू केली आहे. उद्या, (ता. २७) शेतकरी दिनाच्या औचित्याने कृषी विभागाच्या पुढाकारातून राज्यभरात विविध कृषी महोत्सवांचे आणि शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.