FDA : नगर : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सूचनांनुसार गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात प्रशासनाकडून दूध भेसळखोरांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. त्यामुळे अनेकांनी याचा धसका घेतल्याची चर्चा आहे. कदाचित, याच कारणातून मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये दररोज तब्बल दोन लाख लिटर दूध घटल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
नक्की वाचा : नाशिक- पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी नऊ ऑगस्टला जनआंदोलन : सत्यजित तांबे
दूध संकलन घटले
जिल्ह्यात डेअरी विभागाच्या माध्यमातून दर महिन्याला दररोजच्या दूध संकलनाचा अहवाल तयार केला जातो. जिल्ह्यात साधारणतः 153 सहकारी संस्थासह खासगी दूध संकलनाची आकडेवारी ही शासनाकडे पाठवली जाते. मे महिन्यात 48.32 लाख लिटर दरोज दूध संकलन सुरू होते. गत वर्षभरात जिल्ह्यात दररोज चार लाख लिटर दूध वाढल्याचे यातून पुढे आले होते. मात्र, मे महिन्यातच आयुक्त मुंडे यांनी दूध भेसळीवर कारवाई सुरू केली होती.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाच लाख लिटरपर्यंत घट (FDA)
जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाने उशीरा का होईना, पण कारवाईचे धाडस दाखवले. यातून अनेकांनी धसका घेतल्याचे दिसते. काल दि. 10 रोजी डेअरी विभागाचा जून महिन्यातील अहवाल समोर आला आहे. यात दररोज 46.81 लिटर दूध संकलन झाले. अर्थात दररोज सुमारे दोन लाख लिटर दूध कमी झाल्याचे ‘प्रशासकीय’ आकडेवारीतून दिसले. मात्र, प्रत्यक्षात हा दूध संकलन आकडा पाच लाख लिटरपर्यंत घटलेला असू शकतो, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.



