Financial Misconduct : सुरभी हॉस्पिटलमध्ये २ कोटी ७४ लाखांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; माजी संचालकाविरुद्ध फिर्याद दाखल

समृद्धी हेल्थकेअर या फर्मसोबत झालेल्या कथित सामंजस्य करारातूनही संबंधितांना आर्थिक लाभ झाल्याचा आरोप

0
Financial Misconduct : सुरभी हॉस्पिटलमध्ये २ कोटी ७४ लाखांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; माजी संचालकाविरुद्ध फिर्याद दाखल
Financial Misconduct : सुरभी हॉस्पिटलमध्ये २ कोटी ७४ लाखांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; माजी संचालकाविरुद्ध फिर्याद दाखल

Financial Misconduct : नगर : सुरभी हॉस्पिटल्स प्रा. लि (Surbhi Hospital) मध्ये आर्थिक गैरव्यवहार (Financial Misconduct), रुग्णांच्या बिलांची नोंद गायब करणे, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि कंपनीचे रेकॉर्ड ताब्यात घेऊन पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीचे संचालक अमित कोठारी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) माजी संचालक डॉ. राकेश कांतीलाल गांधी व इतरांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या कथित गैरव्यवहारात कंपनीची सुमारे २ कोटी ७४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

नक्की वाचा : कल्याण रोडवरील महापालिकेच्या ग्रीन वेस्टच्या डम्पिंग यार्डला आग

आर्थिक तपशील जाणूनबुजून बदलल्याचा आरोप

सुरभी हॉस्पिटल्स प्रा. लि. या कंपनीची स्थापना ७ डिसेंबर २०१७ रोजी झाली. रुग्णालयात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून डॉक्टर आणि इतर गुंतवणूकदारांकडून पैसे घेण्यात आल्याचा आरोप आहे. कंपनीच्या २०१७-१८ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील व्यवहारांची तपासणी करताना आर्थिक अनियमितता आढळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कंपनीच्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २३० रुग्णांच्या आयपीडी बिलांची नोंद कंपनीच्या हिशेबात नसल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. कोविड काळातील या रुग्णांच्या उपचारांचे सरासरी बिल एक लाख रुपये गृहीत धरल्यास सुमारे २ कोटी ३० लाख रुपयांच्या उत्पन्नाची नोंद नसल्याचा आरोप आहे. तसेच हॉस्पिटलच्या व्यवस्थापन सॉफ्टवेअरमधील ओपीडी रुग्णांच्या नोंदी आणि आर्थिक तपशील जाणूनबुजून बदलल्याचा किंवा हटवल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी (Financial Misconduct)

याशिवाय, रुग्णांकडून स्वीकारलेल्या आणि पावत्या दिलेल्या ४४ लाख रुपयांच्या रकमेचा हिशेब नसल्याचे वैधानिक लेखापरीक्षण अहवालात नमूद असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. समृद्धी हेल्थकेअर या फर्मसोबत झालेल्या कथित सामंजस्य करारातूनही संबंधितांना आर्थिक लाभ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कंपनीचे महत्त्वाचे दस्तऐवज आणि आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड ताब्यात घेऊन पुरावे नष्ट केल्याचाही आरोप आहे. फॉरेन्सिक ऑडिट अहवालाच्या आधारे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे.