Firodia Shivajians : फिरोदिया शिवाजियन्सचा संघ प्रतिष्ठेच्या ऑल इंडिया गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना

0
Firodia Shivajians : फिरोदिया शिवाजियन्सचा संघ प्रतिष्ठेच्या ऑल इंडिया गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना
Firodia Shivajians : फिरोदिया शिवाजियन्सचा संघ प्रतिष्ठेच्या ऑल इंडिया गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना

Firodia Shivajians : नगर : अहिल्यानगरचा फिरोदिया शिवाजियन्स (Firodia Shivajians) एफसी संघ प्रतिष्ठेच्या ऑल इंडिया गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्पर्धेसाठी (All India Gadhinglaj United Football Tournament) रवाना झाला आहे. या स्पर्धेला 50 वर्षांहून अधिक वर्षांची गौरवशाली परंपरा असून देशभरातील अनेक नामांकित व बलाढ्य संघ या स्पर्धेत सहभागी होतात.ही स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (AIFF) मार्गदर्शक तत्त्वांनुसार तसेच कॉम्पिटिशन मॅनेजमेंट सिस्टीम (CMS) अंतर्गत आयोजित केली जाते. या हंगामातील फिरोदिया शिवाजियन्स एफसी संघाची ही पहिलीच बाहेरगावची स्पर्धा असून आगामी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ फुटबॉल लीग चॅम्पियनशिपच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

नक्की वाचा : पारनेर येथे सेनापती बापट यांच्या प्रतिकृतीस खासदार लंकेंच्या हस्ते पुष्पहार अर्पण

जॉर्डन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण

या स्पर्धेच्या तयारीसाठी फरोदिया शिवाजियन्स संघाला पुण्याचे जॉर्डन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. जॉर्डन हे दुसऱ्या पिढीतील शिवाजियन्स खेळाडू असून त्यांनी भारतातील अनेक नामांकित क्लबकडून फुटबॉल खेळला आहे. तसेच जर्मनीतील लीग फुटबॉल स्पर्धांमध्येही खेळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवाचा फायदा संघातील खेळाडूंना शिस्त, खेळातील डावपेच आणि संघबांधणीच्या दृष्टीने होत आहे. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राज्य लीग स्पर्धेसाठी संघ अधिक सक्षम बनेल: नरेंद्र फिरोदिया (Firodia Shivajians)

राजेश अँथनी हे संघ व्यवस्थापक म्हणून संघासोबत रवाना झाले आहेत. स्पर्धेदरम्यान संघाचे नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी ते सांभाळणार आहेत.
अहिल्यानगरच्या फुटबॉल क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा फिरोदिया शिवाजियन्स एफसी संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशातील बलाढ्य संघांविरुद्ध आपली ताकद आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेमुळे खेळाडूंना उच्च दर्जाच्या फुटबॉलचा अनुभव मिळणार असून आगामी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ लीग स्पर्धेपूर्वी संघाच्या तयारीचा आढावा घेण्याची संधी मिळाली आहे.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत संघ उत्तम कामगिरी करेल आणि आगामी राज्य लीग स्पर्धेसाठी अधिक सक्षम बनेल असा विश्वास क्लबचे सहमालक नरेंद्र फिरोदिया आणि मनोज वाळवेकर यांनी व्यक्त केला असून संघाला स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.