Firodiya Shivajians Academy : फिरोदिया शिवाजियन्सच्या स्पर्धेत रिमझिम पावसात रंगला फुटबॉलचा थरार

Firodiya Shivajians Academy : फिरोदिया शिवाजियन्सच्या स्पर्धेत रिमझिम पावसात रंगला फुटबॉलचा थरार

0
Firodiya Shivajians Academy : फिरोदिया शिवाजियन्सच्या स्पर्धेत रिमझिम पावसात रंगला फुटबॉलचा थरार
Firodiya Shivajians Academy : फिरोदिया शिवाजियन्सच्या स्पर्धेत रिमझिम पावसात रंगला फुटबॉलचा थरार

अशोकभाऊ फिरोदिया, आयकॉन आणि श्री साई स्कूलची दमदार कामगिरी; आठरे पाटील स्कूलचा 8-1 ने दणदणीत विजय
गोलांचा वर्षाव अन्‌ काही सामने गोलशून्य

Firodiya Shivajians Academy : अहिल्यानगर : फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी (Firodiya Shivajians Academy) आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत (8th Inter-School Football Tournament) गुरुवारी (दि. 30 जुलै) विविध वयोगटांतील अत्यंत रंगतदार आणि चुरशीचे सामने रंगले होते. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असतानाही खेळाडूंनी उत्साहात खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. काही सामन्यांत गोलांचा अक्षरशः पाऊस पडला, तर काही सामने अखेरपर्यंत गोलशून्य राहिल्याने शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा कायम राहिली.

दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ

स्पर्धेच्या सकाळच्या सत्रात 14 वर्षांखालील मुलांच्या गटात अशोकभाऊ फिरोदिया स्कूल आणि ऑक्झिलियम कॉन्व्हेंट यांच्यात सामना रंगला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र बचावफळीने उत्कृष्ट कामगिरी केल्याने एकाही संघाला गोल करता आला नाही. परिणामी हा सामना 0-0 असा अनिर्णित राहिला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

4-1 अशा फरकाने विजय (Firodiya Shivajians Academy)

16 वर्षांखालील मुलांच्या गटात अशोकभाऊ फिरोदिया स्कूलने ऑक्झिलियम कॉन्व्हेंटवर 4-1 अशा फरकाने प्रभावी विजय मिळवला. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला आर्यन जाधवने गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर आयुष गाडलकरने 25, 30 आणि 53 व्या मिनिटाला सलग तीन गोल करत हॅट्‌ट्रिकची नोंद केली. ऑक्झिलियम कॉन्व्हेंटला 58 व्या मिनिटाला श्रीराम बल्लाळच्या सेल्फ गोलमुळे एकमेव गोल मिळाला. मात्र अशोकभाऊ फिरोदिया स्कूलच्या आक्रमक खेळापुढे त्यांना टिकाव धरता आला नाही.

Firodiya Shivajians Academy : फिरोदिया शिवाजियन्सच्या स्पर्धेत रिमझिम पावसात रंगला फुटबॉलचा थरार
Firodiya Shivajians Academy : फिरोदिया शिवाजियन्सच्या स्पर्धेत रिमझिम पावसात रंगला फुटबॉलचा थरार

16 वर्षांखालील मुलींच्या गटात आयकॉन स्कूलने आर्मी (एम.आय.सी. अँड एस.) स्कूलवर 2-0 असा विजय मिळवला. आयकॉन स्कूलकडून वैष्णवी जगतापने 13 व्या मिनिटाला, तर गौरी आचार्याने 28 व्या मिनिटाला गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. बचावफळीनेही तितकाच उत्कृष्ट खेळ करत आर्मी स्कूलला एकही गोल करू दिला नाही.

Firodiya Shivajians Academy : फिरोदिया शिवाजियन्सच्या स्पर्धेत रिमझिम पावसात रंगला फुटबॉलचा थरार
Firodiya Shivajians Academy : फिरोदिया शिवाजियन्सच्या स्पर्धेत रिमझिम पावसात रंगला फुटबॉलचा थरार

दुपारच्या सत्रात याच गटातील दुसऱ्या सामन्यात श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूलने ऊर्जा गुरुकुलवर 2-0 असा विजय मिळवला. श्री साई स्कूलकडून हृदया तडकेने 23 व्या मिनिटाला, तर तनुजा गुंजाळने 28 व्या मिनिटाला गोल करत संघाचा विजय निश्‍चित केला. संपूर्ण सामन्यात श्री साई स्कूलने वर्चस्व राखत प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्याची कोणतीही संधी दिली नाही.

12 वर्षांखालील मुलांच्या गटात आठरे पाटील स्कूल आणि आयकॉन स्कूल यांच्यात झालेला सामना अत्यंत अटीतटीचा ठरला. दोन्ही संघांनी सातत्याने आक्रमणे केली, मात्र एकाही संघाला गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना 0-0 असा अनिर्णित राहिला.

14 वर्षांखालील मुलांच्या गटात मात्र आठरे पाटील स्कूलने आयकॉन स्कूलवर तब्बल 8-1 असा दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक नोंदवला. अलख वराळने 17 व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर वेदांत ससे या खेळाडूने 20, 23, 42, 45 आणि 48 व्या मिनिटाला तब्बल पाच गोल झळकावत अप्रतिम खेळाचे दर्शन घडवले. याशिवाय साई धामणेने 25 व्या मिनिटाला आणि कृष्णा घोरपडेने 32 व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. आयकॉन स्कूलला प्रतिक पवारच्या सेल्फ गोलमुळे एकमेव गोल मिळाला. आठरे पाटील स्कूलच्या वेगवान आणि आक्रमक खेळीपुढे आयकॉन स्कूलचा बचाव पूर्णपणे निष्प्रभ ठरला.
16 वर्षांखालील मुलांच्या गटातील आठरे पाटील स्कूल आणि आयकॉन स्कूल यांच्यातील सामना देखील शेवटपर्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र दोन्ही बाजूंच्या बचावफळीने उत्कृष्ट कामगिरी करत एकही गोल होऊ दिला नाही. परिणामी हा सामना 0-0 असा अनिर्णित राहिला.