Food Adulteration : फळे-भाजीपाल्यातील भेसळीची तपासणी होणार; दोषींवर गुन्हा, परवाना रद्द होणार

0
Food Adulteration : फळे-भाजीपाल्यातील भेसळीची तपासणी होणार; दोषींवर गुन्हा, परवाना रद्द होणार
Food Adulteration : फळे-भाजीपाल्यातील भेसळीची तपासणी होणार; दोषींवर गुन्हा, परवाना रद्द होणार

Food Adulteration : नगर : राज्यात फळे भाजीपाला यामधील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. बाजार समित्या, खासगी बाजार तसेच पणन परवानाधारकांना याबाबत तातडीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भेसळयुक्त व आरोग्यास अपायकारक कृषी माल विक्री करणाऱ्यांविरुद्ध नियमित तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले असून, दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करण्याबरोबरच संबंधितांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा : पाथर्डीतील जुन्या पालिका इमारतीत चोरी; ४२ हजारांचा ऐवज लंपास

तपासणीचे निर्देश

राज्यातील सर्व बाजार समित्यांना बाजार परिसरात येणाऱ्या कृषी मालाची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी वापरली जाणारी रसायने, भाज्यांवर फवारण्यात येणारे रंगद्रव्य, मसाले व सुका मेव्यांमधील भेसळ आणि वजनातील फसवणूक यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

नक्की पहा : अहिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची माहिती

भेसळ करणाऱ्यांचे परवाने होणार रद्द (Food Adulteration)

तपासणीत दोषी आढळणाऱ्या व्यापारी, विक्रेते किंचा परवानाधारकांवर गुन्हे दाखल करण्यासोबतच त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. बाजार समित्या, खासगी बाजार आणि परवानाधारक व्यापाऱ्यांवर तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. भेसळयुक्त किंवा रासायनिक प्रक्रिया केलेला माल आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.