Football tournament: फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल स्पर्धेत रंगला गोलांचा थरार; सेक्रेड हार्टची दमदार कामगिरी

साई इंग्लिश मीडियम स्कूल आणि आर्मी एमआयसी अँड एस सामना चुरशीचा

0

Football tournament: नगर: फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत (Football tournament) मंगळवारी (ता.28) विविध वयोगटांतील अत्यंत चुरशीचे आणि रोमांचक सामने रंगले. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट, वेगवान आक्रमणे आणि प्रभावी बचावाचे दर्शन घडविले. काही सामने अखेरपर्यंत अटीतटीचे (Hard-fought) झाले, तर काही सामन्यांत विजेत्या संघांनी एकतर्फी वर्चस्व गाजवत दमदार विजयांची नोंद केली.
16 वर्षांखालील मुलींच्या गटात श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल आणि आर्मी एमआयसी अँड एस यांच्यात रंगलेल्या सामन्यात श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलने 1-0 अशा फरकाने विजय मिळवला. सामन्याच्या 36व्या मिनिटाला पूर्वा मालवे हिने केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला. श्री साईच्या बचावफळीने आर्मी संघाला एकही गोल करण्याची संधी न देता शानदार बचाव केला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.

अवश्य वाचा- बारामती येथील राज्यस्तरीय स्केटिंग मॅरेथॉनमध्ये अहिल्यानगर जिल्हा प्रथम; पटकावली ६ फुटांची मानाची ट्रॉफी

साई इंग्लिश मीडियम स्कूल आणि आर्मी एमआयसी अँड एस सामना चुरशीचा (Football tournament)


16 वर्षांखालील मुलांच्या गटात श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल आणि आर्मी एमआयसी अँड एस यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी वेगवान खेळ आणि आक्रमक रणनीती अवलंबली. मात्र, दोन्ही बाजूंच्या बचावफळीने भक्कम कामगिरी केल्याने कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. परिणामी हा सामना 0-0 गोलने बरोबरीत संपला.
14 वर्षांखालील मुलांच्या गटात आर्मी एमआयसी अँड एसने श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलवर 2-0 असा प्रभावी विजय मिळवला. आर्मी संघाकडून राजवीर याने 28व्या मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर 32व्या मिनिटाला जायन शेख याने आणखी एक गोल करत आघाडी दुप्पट केली. उत्कृष्ट बचाव आणि आक्रमक खेळाच्या जोरावर आर्मी संघाने सामना सहज आपल्या नावावर केला.

विराज देशमुखचा 15 व्या मिनिटाला पहिला गोल (Football tournament)

याच गटातील पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि ऊर्जा गुरुकुल यांच्यातील सामन्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलने 2-0 असा विजय मिळवला. पोदारकडून विराज देशमुख याने 15व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर साई जाधव याने 45व्या मिनिटाला दुसरा गोल करत विजय निश्‍चित केला. ऊर्जा गुरुकुलला मात्र संपूर्ण सामन्यात गोल करता आला नाही. दुपारच्या सत्रात 12 वर्षांखालील मुलांच्या गटात ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूलने सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटवर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. ओएसिसचा आर्यन पंडित हा सामन्याचा नायक ठरला. त्याने 6व्या आणि 11व्या मिनिटाला सलग दोन गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आदित्य सिंग याने 38व्या मिनिटाला आणखी एक गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

14 वर्षांखालील मुलांच्या गटात मात्र सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटने पुनरागमन करत ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूलवर 2-0 असा विजय मिळवला. सेक्रेडहार्टकडून स्तवन याने 32व्या मिनिटाला तर आनंद शिंदे याने 37व्या मिनिटाला गोल करत संघाला महत्त्वाचा विजय मिळवून दिला.
दिवसातील सर्वाधिक लक्षवेधी सामना 16 वर्षांखालील मुलांच्या गटात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट आणि ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात झाला. या सामन्यात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत तब्बल 6-0 अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला. ओएसिसच्या बचावफळीवर सतत दबाव निर्माण करत सेक्रेडहार्टच्या खेळाडूंनी गोलांचा अक्षरशः पाऊस पाडला.

नक्की वाचा: अन्यायाविरुद्ध उभा ठाकणार ‘रंगा’! ‘सायको रंगा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ..!!!


या सामन्यात अंशुमन विधाते हा स्टार खेळाडू ठरला. त्याने एकूण चार गोल करत प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीला अक्षरशः हैराण केले. त्याने 6व्या, 28व्या, 45व्या आणि 56व्या मिनिटाला गोल नोंदवले. तर अली मिर्झा याने 47व्या मिनिटाला एक गोल करत संघाच्या विजयात मोलाची भर घातली. सेक्रेडहार्टच्या आक्रमक खेळीपुढे ओएसिस संघ पूर्णपणे निष्प्रभ ठरला आणि त्यांना एकही गोल करता आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here