Gas Cylinder DAC Number : गॅस सिलिंडरसाठी सरकारने आणला नवा नियम ; वाचा काय आहे तो नवा नियम?

0
Gas Cylinder DAC Number : गॅस सिलिंडरसाठी सरकारने आणला नवा नियम ; वाचा काय आहे तो नवा नियम?
Gas Cylinder DAC Number : गॅस सिलिंडरसाठी सरकारने आणला नवा नियम ; वाचा काय आहे तो नवा नियम?

नगर : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे (US-Israel-Iran War) जागतिक पातळीवर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या युद्धामुळे भारतात लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाहीये. विशेष म्हणजे गॅस सिलिंडर बुक (Gas Cylinder Booking) करूनही लोकांना चार ते सात दिवस वाट पाहावी लागत आहे. या फसवणुकीला आळा बसावा, यासाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने गॅस सिलिंडर बुकिंग आणि डिलिव्हरीमध्ये (Gas Cylinder DAC Number) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात अंत्योदय रेशनकार्डधारकांना मिळणार मोफत साडी

सरकारने नेमका काय निर्णय घेतला? (Gas Cylinder DAC Number)

आता गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर प्रत्येक वेळी DAC नंबर म्हणजेच डिलिव्हर ऑथेंटिफिकेशन नंबर मिळेल. हा डीएसी नंबर गॅस डिलिव्हरी करताना तुम्हाला डिलिव्हरी बॉयला द्यावा लागेल. तुमच्याकडे हा डीएसी नंबर नसेल तर तुम्हाला गॅस सिलिंडर मिळणार नाही. विशेष म्हणजे हा नियम लागू देखील झाला आहे. देशातील साधारण ९२ टक्के गॅस सिलिंडरची डिलिव्हरी अशाच प्रकारे केली जात आहे. या डीएसी नंबरच्या प्रक्रियेत अलिकडेच तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे यात काही अपडेट करण्यात आले होते. या अपडेटमुळे गॅस डिलिव्हरीची प्रक्रिया सोपी होणार आहे.

अवश्य वाचा : लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतकऱ्याचा काम करताना दुर्दैवी अंत

डीएसी नंबर ग्राहकांना कसा मिळतो? (Gas Cylinder DAC Number)

तुम्ही कॉल किंवा एसएमएस करून गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर तुम्हाला हा डीएसी नंबर मिळतो. त्यासाठी गॅस बुक केल्यानंतर थोडा वेळ वाट पाहावी. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईलवर एक नंबर मिळेल. हाच नंबर डीएसी नंबर असेल. गॅस डिलिव्हरी बॉय तुमच्याकडे गॅस सिलिंडर द्यायला येईल, त्या वेळी तुम्ही हा डीएसी नंबर त्याला सांगावा. त्यानंतरच तुम्हाला गॅस सिलिंडर मिळेल.