नगर : गॅस सिलिंडरचा (Gas Cylinder New Rule) वापर करणाऱ्या नागरिकांना तसेच व्यावसायिकांना लवकर गॅस सिलिंडर मिळावा आणि गॅस सिलिंडरचे वितरण सोपे आणि सहज कसे होईल, यासाठी सरकारकडून नेहमीच वेगवेगळे प्रयत्न केले जातात. अशातच आता गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत मोठा निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या सामान्य माणसाच्या डोक्याचा ताण मिटू शकतो. सरकार दहा किलोचा सिलेंडर (10 kg cylinder) आणण्याच्या तयारीत आहे.
नक्की वाचा : सत्कारात नाव न पुकारल्याने तलाठ्याचा संताप; लोखंडी माईक डोक्यात घालून तरुणाला केले रक्तबंबाळ
निर्णय का घेतला? (Gas Cylinder New Rule)
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच छोटे व्यावसायिक, स्ट्रिट फूड विक्रेते, विद्यार्थी, प्रवासी मजूर यांच्या स्वयंपाकासाठी गॅस खरेदी करणे आणखी सोपे होणार आहे. कारण इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या शासकीय कंपन्या लवकच १० किलो वजन असणारा गॅस सिलिंडर लॉन्च करण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा फायदा घरगुती गॅस सिलिंडर वापरणारे तसेच व्यावसायिक सिलिंडर वापरणारे अशा दोघांनाही होणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास देशातील लाखो लोकांना याचा फायदा मिळेल. अनेकांना १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर वाहून नेण्यास अनेक अडचणी येतात.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे ५० हजार भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाणार!
१० किलोच्या सिलिंडरची विशेषता काय? (Gas Cylinder New Rule)
सध्या बाजारात १९ किलो, ५ किलो, २ किलो अशा प्रकारात व्यावसायिक गॅस सिलिंडर अपलब्ध आहेत. यातील १९ किलोचा गॅस सिलिंडर वजनाने खूप जड असतो. त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच चहाची दुकाने, चोटे फूड स्टॉल, विद्यार्थी, भाड्याने राहणारे लोक छोट्या आणि कमी वजनाच्या गॅस सिलिंडरची मागणी करत होते. त्यामुळे आता १० किलोचे कम्पोझिट गॅस सिलिंडर लॉन्च करण्यावर विचार केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा नवा सिलिंडर हाय डेनसिटी पॉलिएथिलीनपासून तयार करण्यात येईल. पारंपरिक गॅस सिलिंडरच्या तुलनेत हा नवा गॅस सिलिंडर ५० टक्क्यांनी हलका असेल. त्याचा फायदा अनेकांना होईल.



