Alyad Palyad Movie: गौरव मोरेची उडाली घाबरगुंडी;’अल्याड पल्याड’चा टीझर प्रदर्शित

दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा 'अल्याड पल्याड' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टिझरने प्रेक्षकांची मने जिंकली

0
Alyad Palyad Movie
Alyad Palyad Movie

नगर : मराठी चित्रपटसृष्टीत विविध वेगळे विषय घेऊन चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा ‘अल्याड पल्याड’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरने आणि उत्कंठावर्धक टिझरने (Teaser Release) प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पोस्टरमध्ये घाबरलेल्या अंदाजात अभिनेता गौरव मोरे (Gaurv More) पाहायला मिळतोय.

नक्की वाचा : अभिनेते मोहन जोशी साकारणार मनोज जरांगेंच्या वडिलांची भूमिका!   

टिझरमध्ये गौरव मोरेची उडाली घाबरगुंडी (Alyad Palyad Movie)

आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने रसिकांना खळखळून हसवणाऱ्या गौरव मोरेची सध्या घाबरगुंडी उडाल्याचे या टिझर मध्ये पाहायला मिळत आहे. गौरव नेमका कोणाला आणि कशासाठी  घाबरला आहे? हा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल तर ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटात पहिल्यांनंतर त्याच उत्तर तुम्हाला मिळणार आहे. एस. एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाची निर्मिती  शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली आहे. तर या चित्रपटात हास्यजत्रा फेम गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, अनुष्का पिंपुटकर या कलाकारांसोबत भाग्यम जैन हा नवा चेहरा या दिसणार आहे. गौरव मोरेच्या करिअरमधली ही नवी इनिंग आहे.

चित्रपटात नेमके काय ? (Alyad Palyad Movie)

आपला महाराष्ट्र हा समृद्धतेने आणि विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती तसेच प्रथा, परंपरा आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या एका गावाची, तिथल्या माणसांची कथा सांगणारा ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. चित्रपटाची कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत.‘अल्याड पल्याड’ चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांनी केलंय तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे. कला दिग्दर्शन योगेश इंगळे यांनी केले असून कार्यकारी निर्माते संतोष खरात आहेत.

अवश्य वाचा : RCB च्या महिला संघाने करून दाखवले! पहिल्यांदाच पटकावलं विजेतेपद  

यावेळी एका चांगल्या चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद अभिनेता गौरव मोरे ने व्यक्त केला आहे. पोस्टर आणि टिझर अनावरण प्रसंगी बोलताना दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील म्हणाले की,वेगळ्या विषयावरचा ‘अल्याड पल्याड’ चित्रपट करताना खूप मजा आली. प्रेक्षकही हा चित्रपट तितकाच एन्जॉय करतील. उत्तम कलाकारांच्या टीमसोबत एका वेगळ्या विषयावर चित्रपट करण्याची संधी आम्हाला महत्त्वाची वाटल्यामुळे चित्रपट निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

 .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here