Get Together : राहुरी : तालुक्यातील वांबोरी येथील महेश मुनोत माध्यमिक विद्यालयातील (Mahesh Munot Secondary School) इयत्ता १० वी तुकडी ब (२००४-२००५) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा (Get Together) तब्बल २० वर्षानंतर (After 20 Years) उत्साहात पार पडला.
नक्की वाचा : मोठी बातमी! मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनमधून पडून ५ जणांचा मृत्यू
इयत्ता १०वी तुकडी ब (२००४-२००५) ची बॅच
जुने दिवस आठवले… आणि मन पुन्हा शालेय वयात गेले. हेच शब्द होते. वांबोरी गावतले महेश मुनोत माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १०वी तुकडी ब (२००४-२००५) च्या बॅचच्या स्नेहमेळाव्यास आलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांचे. तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र येण्याचा आनंद, आठवणींचा कल्लोळ आणि शिक्षकांबद्दलची कृतज्ञता यांनी शाळेचा परिसर भारून गेला.
अवश्य वाचा : गृहकर्ज,वाहन कर्ज स्वस्त होणार;रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला
मेळाव्याला जवळपास संपूर्ण बॅचने लावली हजेरी (Get Together)
या मेळाव्याला जवळपास संपूर्ण बॅचने हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या जुन्या गप्पा, टोपणनावांनी हाक मारणे, वर्गातील किस्से, शिक्षकी शिस्तीची गंमतीशीर आठवण, आणि ‘ती’ एकत्र असलेली दप्तरं उचलून पळणारी मस्ती सर्व काही जणू पुन्हा एकदा जिवंत झाले.
कार्यक्रमास एकनाथ गोसावी सर, शंकर शेवाळे सर, रवींद्र शिंदे सर, बाबासाहेब पटारे सर व संगिता कोळी मॅडम उपस्थित होत्या. यामध्ये प्रवीण राऊत, राहुल काकडे, वनेश्वर जाधव, महेश शेजवळ, संतोष आव्हाड, उमेश भालेराव, नितीन देवकर, विशाल ससाणे, सिद्धार्थ गाधले, अरुण पटारे, अभिजीत बडाख, सागर चौधरी, विनायक मोरे, ज्ञानेश्वर चिंधे, भरत पटारे, राजेंद्र मते, योगेश तागड, संतोष पंडित, महेश लोखंडे, अमोल खंडागळे, सोमनाथ तोडमल, तुषार येवले, नामदेव यळवंडे, विशाल साळुंके, महेश जगदाळे, नवनाथ जवरे, राजेंद्र दांगट, प्रशांत भाकरे, वैशाली गायकवाड, वर्षा चोथे, रुपाली शिंदे, पुनम राऊत, गीता भांड, मंगल काटे, वैशाली मोरे, आशा मोरे, सुनीता कल्हापुरे, स्वाती ससे, प्रीती डोळसे, स्नेहल कुऱ्हाडे इत्यादींचा उल्लेखनीय सहभाग होता.
स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशोगाथा शेअर करत शाळेच्या भूमिकेबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. राहुल काकडे, प्रशांत भाकरे, रुपाली शिंदे, पुनम राऊत यांच्यासारख्या अनेक विद्यार्थी आता विविध क्षेत्रांत आहेत त्याच प्रमाणे वनेश्वर जाधव, महेश शेजवळ, नितीन देवकर, विशाल ससाणे, अभिजीत बडाख, सागर चौधरी, अमोल खंडागळे, सोमनाथ तोडमल, तुषार येवले, नामदेव यळवंडे, विशाल साळुंके, महेश जगदाळे, नवनाथ जवरे व्यवसायिक आहात. आशा मोरे, सुनीता कल्हापुरे त्यांनी शाळेतील अनुभव, शिस्त आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या आवारातील जुन्या खुणा आणि वर्गाच्या बाकांपर्यंत सगळीकडे आठवणींने दाटून आल्या. काहींना ओळखणे अवघड झाले होते, काही अगदी तशीच ठेवणीतली मूर्ती होती. गळाभेटींमधून काळाच्या अंतराची दरी मिटत गेली. एकत्र स्नेहभोजन घेताना जुन्या चवीनं आणि नव्या संवादांनी मनं भरून आली. सूत्रसंचालन राहुल काकडे, पुनम राऊत यांनी केले तर आभार रुपाली शिंदे यांनी मानले. तसेच एकनाथ गोसावी, शंकर शेवाळे सर, रवींद्र शिंदे, पटारे सर आणि कोळी मॅडम यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले विचार दिले आहेत.