Gold stolen from woman’s bag : पुणे-नगर प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगेतून साडेपाच तोळे लंपास; तारकपूर बसस्थानकात उतरल्यानंतर प्रकार उघड

Gold stolen from woman's bag : पुणे-नगर प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगेतून साडेपाच तोळे लंपास; तारकपूर बसस्थानकात उतरल्यानंतर प्रकार उघड

0
Gold stolen from woman's bag : पुणे-नगर प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगेतून साडेपाच तोळे लंपास; तारकपूर बसस्थानकात उतरल्यानंतर प्रकार उघड
Gold stolen from woman's bag : पुणे-नगर प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगेतून साडेपाच तोळे लंपास; तारकपूर बसस्थानकात उतरल्यानंतर प्रकार उघड

Gold stolen from woman’s bag : नगर : पुणे येथून अहिल्यानगरकडे बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतील सुमारे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास (Gold stolen from woman’s bag) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मनिषा विश्वास कुलकर्णी (वय ५४, रा. रावेत, ता. मावळ, जि. पुणे) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) फिर्याद दिली आहे.

चहासाठी उतरल्यावर चाेरी झाल्याचा संशय

कुलकर्णी या आपल्या मुलीसोबत अहिल्यानगर येथील साईरामनगर, भिस्तबाग नाका परिसरात राहणारे त्यांचे भाऊ प्रसाद शशिकांत नंदे यांच्या घरी कार्यक्रमासाठी येत होत्या. सकाळी नऊच्या सुमारास त्या घरातून निघाल्या. कार्यक्रमासाठी त्यांनी गळ्यातील सोन्याचे पट्टी मंगळसूत्र व कानातील सोन्याचे झुमके एका छोट्या पर्समध्ये ठेवले. ही पर्स त्यांनी मोठ्या बॅगेत ठेवली होती. पती विश्वास कुलकर्णी यांनी त्यांना व त्यांच्या मुलीला शिवाजीनगर येथे सोडले. तेथून त्यांनी शिवाजीनगर ते तारकपूर असा प्रवास करण्यासाठी तिकीट घेतले आणि शिवाई बस मधून अहिल्यानगरकडे रवाना झाल्या. दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास बस सुपा येथील सुजय हॉटेलजवळ चहासाठी थांबली. त्यावेळी कुलकर्णी व त्यांची मुलगी बसमधून खाली उतरल्या. चहा घेतल्यानंतर त्या पुन्हा बसमध्ये बसल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (Gold stolen from woman’s bag)

दुपारी सव्वातीनच्या सुमारास बस तारकपूर येथे पोहोचली. बसमधून उतरल्यानंतर कुलकर्णी यांनी बॅगेची पाहणी केली असता छोट्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. त्यानंतर त्या भावाच्या घरी गेल्यानंतर पुन्हा बॅग तपासली. त्यावेळीही दागिने नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रवासादरम्यान चोरट्याने बॅगेतून दागिने चोरल्याचा संशय त्यांना आला. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे पाच तोळे वजनाचे सोन्याचे पट्टी मंगळसूत्र, तसेच पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके यांचा समावेश आहे. दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.