Government Medical College : अहिल्यानगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसाठी मुंबईत बैठक

Government Medical College : अहिल्यानगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसाठी मुंबईत बैठकv

0
Government Medical College : अहिल्यानगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसाठी मुंबईत बैठक
Government Medical College : अहिल्यानगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसाठी मुंबईत बैठक

Government Medical College : अहिल्यानगर येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Government Medical College) कायमस्वरूपी जागेचा प्रश्न निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. महाविद्यालयासाठी प्रस्तावित जागांबाबत मुंबई (Mumbai) येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली असून, कापूरवाडी आणि आरणगाव या दोन ठिकाणांपैकी एका जागेची निवड करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र अंतिम निर्णय मंत्र्यांच्या समितीकडूनच जाहीर केला जाणार आहे.

बैठकीला राधाकृष्ण विखे-पाटीलही उपस्थित (Government Medical College)

या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आयुक्त, संचालक, जिल्हाधिकारी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते. महाविद्यालयासाठी योग्य जागा निश्चित करण्याच्या दृष्टीने विविध तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची मुख्य इमारत उभारणीच्या प्रक्रियेत आहे. कायमस्वरूपी इमारत पूर्ण होईपर्यंत महाविद्यालयाचे शैक्षणिक कामकाज जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा आयुष रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू ठेवण्यात आले आहे.

हे वाचा : फिरोदिया शिवाजियन्स एफसी सरपंच चषकाचे विजेते

महाविद्यालयासाठी तीन जागांचा प्रस्ताव (Government Medical College)

महाविद्यालयासाठी सुरुवातीला कापूरवाडी, आरणगाव आणि नेप्ती या तीन ठिकाणांचा विचार करण्यात आला होता. संबंधित विभागांनी या तिन्ही जागांचे प्रस्ताव तयार केले होते. मात्र विविध निकषांवर एकमत न झाल्यामुळे जागा निश्चितीचा निर्णय प्रलंबित राहिला. त्यानंतर या प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्यासाठी मंत्र्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली.

एका जागेला अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता

मुंबईतील बैठकीत नेप्ती येथील जागा पूरप्रवण क्षेत्रात असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. त्यामुळे त्या प्रस्तावाला अपेक्षित गती मिळू शकली नाही. परिणामी आता कापूरवाडी आणि आरणगाव या दोन पर्यायांवरच मुख्य भर देण्यात आला असून, यापैकी एका जागेला अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: कर्जतला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

महाविद्यालयाची जागा निश्चित झाल्यानंतर आराखडा, प्रशासकीय मंजुरी आणि प्रत्यक्ष बांधकाम प्रक्रियेला वेग मिळणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षणासह आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.