Illegal Liquor Sales : कोतूळ परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

0
Illegal Liquor Sales : कोतूळ परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
Illegal Liquor Sales : कोतूळ परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

Illegal Liquor Sales : अकोले : तालुक्यातील कोतूळ परिसरात अवैधरीत्या सुरू असलेल्या दारूविक्रीवर पोलिसांनी कारवाई करत दोन ठिकाणांहून दारू व ताडी जप्त केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार अकोले पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा : यंदा मान्सून वेळेतच धडकणार; हवामान खात्याचा अंदाज आला…

ताडी व दारू विक्री

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतूळ पुलाजवळ सचिन दत्तात्रय देशमुख हा इसम घराच्या आडोशाला पावडरसदृश वस्तूपासून तयार केलेली ताडी व दारू विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे एक हजार रुपये किंमतीची दहा लिटर दारू व ताडी जप्त केली आहे.

नक्की पहा : जितेंद्र आव्हाडांना नगरमध्ये जातिवंत घोडे दाखवतो : परेश पुरोहित

कारवाई मोहीम सुरूच राहणार (Illegal Liquor Sales)

तिथून काही अंतरावरील पिंपळगाव खांड जिल्हा परिषद शाळेजवळील एका हॉटेलच्या मागे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी तुकाराम जगताप हा इसम देशी दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून देशी दारूच्या दहा बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. या दोन्ही कारवाया अकोले पोलिसांनी केल्या असून संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.