Import Duty Hike : सोने-चांदी झाले आणखी महाग; आयात शुल्कात वाढ

0
Import Duty Hike : सोने-चांदी झाले आणखी महाग; आयात शुल्कात वाढ
Import Duty Hike : सोने-चांदी झाले आणखी महाग; आयात शुल्कात वाढ

Import Duty Hike : नगर : परकीय चलनावरील ताण आणि आयात बिल कमी करण्यासाठी सोन्याची खरेदी काही दिवस टाळा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने बुधवारी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवून १५ टक्के केले आहे. याआधी आयातशुल्क ६ टक्के होते. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क ६.४ टक्क्यांवरून १५.४ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे.

हेही वाचा :  कर्जत नगरपंचायतीतील अविश्वास ठरावाला स्थगिती; उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश

सोन्याची मागणी कमी होणार

भारत हा सोन्याची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमाकांचा देश आहे. आयातशुल्कात वाढ केल्यामुळे भारतातील सोन्याची मागणी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातून भारताची व्यापार तूट नियंत्रणात आणण्यास आणि रुपयाला आधार देण्यात यामुळे मदत होऊ शकते.

नक्की पहा : अहिल्यानगर शहरात ऑक्टोबर महिन्यापासून आणखी दोन उड्डाणपूल होणार?; काम अंतिम टप्प्यात

आयातशुल्क १५ टक्क्यांवर (Import Duty Hike)

आयात शुल्क वाढीमुळे सोन्याची तस्करी पुन्हा वाढू शकते, अशी चिंता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण ९५.७५ च्या निचांकी पातळीवर झाली आहे. ही घसरण रोखणे, मौल्यवान धातूंची आयात रोखणे आणि व्यापारी तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारने १० टक्के मूलभूत सीमा शुल्कासह ५ टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर लागू केला आहे. यामुळे एकूण आयातशुल्क १५ टक्क्यांवर पोहोचले आहे.