India vs New Zealand : विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताची धडक; न्युझीलँडवर विजय

भारतीय संघाने न्युझीलँडवर ७० धावांनी विजय मिळविला

0
229

नगर : विश्वचषक (World cup) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यफेरीचा पहिला सामना भारत (India)न्युझीलँड (New Zealand) संघांत झाला. यात भारतीय संघाने न्युझीलँडवर ७० धावांनी विजय मिळविला. मागील विश्वचषकातील उपांत्यफेरीतील पराभवाचा भारतीय संघाने वचपा घेतला.

अवश्य वाचा :  मानसी नाईकची ‘लावा फोन चार्जिंगला’ लावणी  प्रेक्षकांच्या भेटीला

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माने २९ चेंडूंत ४७ धावांची तडाखेबंद फलंदाजी करत ठोस सुरूवात दिली. त्यानंतर शुभमन गिल (६६ चेंडूंत ८० धावा), विराट कोहली (११३ चेंडूंत ११७ धावा) व श्रेयस अय्यर (७० चेंडूंत १०५ धावा) यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ५० षटकांत चार गडी गमावत ३९७ धावा केल्या. न्युझीलँडकडून टीम साउथीने सर्वाधिक तीन फलंदाज बाद केले. विराट कोहलीने शतकांचे अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम केला. 

नक्की पहा : राज्यात पुढील २४ तासाचा पावसाची शक्यता 

मोहम्मद शामीने न्युझीलँडचे दोन आघाडीचे फलंदाज बाद केले. मात्र, त्यानंतर कर्णधार कॅन विल्यमसनने (६९ धावा) डॅरियल मिचेलला बरोबर घेत संघाचा डाव सावरला. मात्र, पुन्हा मोहम्मद शामीने सलग दोन फलंदाज बाद करत न्युझीलँडला पुन्हा अडचणीत आणले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्युझीलँडचे फलंदाज क्रमाक्रमाने बाद केले. मिचेलने (११९ चेंडूंत १३४ धावा) एकाकी लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याला संघाला यश मिळवून देता आले नाही. न्युझीलँडचा संपूर्ण संघ ४८.५ षटकांत ३२७ धावाच जमवू शकला. भारताकडून शामीने सर्वाधिक सात फलंदाज बाद केले. तो सामनावीर ठरला.

या सामन्याची वैशिष्ट्ये

* विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील पहिले शतकांचे अर्धशतक करण्याचा विक्रम केला.

* विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माने केला.

* विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज झाला. त्याने रिकी पाॅटिंगला मागे टाकले. 

* विराट कोहलीने एका विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. २० वर्षांनंतर हा विक्रम मोडण्यात आला.

* विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी सामन्यांत ५० फलंदाज बाद करण्याचा विक्रम मोहम्मद शामीच्या नावावर नोंदविला गेला. त्याने केवळ १७ सामन्यांत ५० पेक्षाही जास्त फलंदाज बाद केले.

* यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक फलंदाज बाद करण्याचा विक्रम मोहम्मद शामीच्या नावे झाला आहे.