Inter-school Competition : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आंतरशालेय स्पर्धा उत्साहात

म. ए. सो. रेणावीकर पूर्व प्राथमिक शाळेत अहिल्यानगर शहरातील बालवाडी विभागातील विविध स्पर्धांमध्ये ७१ विद्यार्थ्यांचा सहभागी

0
Inter-school Competition : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आंतरशालेय स्पर्धा उत्साहात
Inter-school Competition : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आंतरशालेय स्पर्धा उत्साहात

Inter-school Competition : नगर : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (Maharashtra Education Society) वर्धापन दिनानिमित्त म. ए. रेणावीकर पूर्व प्राथमिक शाळा, अहिल्यानगर येथे विविध आंतरशालेय स्पर्धांचे (Inter-school Competition) उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या (Students) सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित व्हावी आणि आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने श्लोक पाठांतर स्पर्धा, चित्रकला व रंगभरण स्पर्धा आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या विविध स्पर्धांमध्ये एकूण ७१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

नक्की वाचा : ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर अनंतात विलीन; केडगाव येथे राहत्या घराजवळ झाला अंत्यविधी

Inter-school Competition : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आंतरशालेय स्पर्धा उत्साहात
Inter-school Competition : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आंतरशालेय स्पर्धा उत्साहात

कलात्मक कौशल्याचा परिचय

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून किरण संपत बारस्कर उपस्थित होत्या त्या शाळेच्या माझी विद्यार्थिनी आहेत. त्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कोष्टी मॅडम यांनी करून दिला. श्लोक पाठांतर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शुद्ध उच्चार, स्पष्ट वाणी आणि उत्तम स्मरणशक्तीच्या जोरावर श्लोकांचे सादरीकरण केले. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून माळवी मॅडम व अद्वंत सर यांनी काम पाहिले. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संस्कार आणि परंपरांविषयी आदरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चित्रकला व रंगभरण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध चित्रांमध्ये आकर्षक रंग भरून आपल्या कल्पकतेचा आणि कलात्मक कौशल्याचा परिचय करून दिला. रंगसंगती, नीटनेटकेपणा आणि सर्जनशीलता यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या चित्रांमध्ये पाहायला मिळाला. या स्पर्धेसाठी बडे सर व ढेरे सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Inter-school Competition : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आंतरशालेय स्पर्धा उत्साहात
Inter-school Competition : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आंतरशालेय स्पर्धा उत्साहात

फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध व्यक्तिरेखा आणि आकर्षक (Inter-school Competition)

वेशभूषांच्या माध्यमातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांचा निरागस अभिनय, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि उत्साह यांमुळे कार्यक्रमात आनंददायी वातावरण निर्माण झाले. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून जैन मॅडम व झरेकर मॅडम यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राजे भोसले मॅडम यांनी केले. आपल्या सुंदर निवेदनाने त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. कार्यक्रमाच्या शेवटी देशपांडे मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून प्रमुख पाहुण्या, परीक्षक, शिक्षकवृंद आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तसेच वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे शाल समिती अध्यक्ष विजयजी भालेराव सर व शाला समिती महामात्र डॉ. उमेशजी बिबवे सर व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा कुलकर्णी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड मॅडम तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Inter-school Competition : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आंतरशालेय स्पर्धा उत्साहात
Inter-school Competition : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आंतरशालेय स्पर्धा उत्साहात

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच सांस्कृतिक जडणघडण, कलात्मक विकास आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व अधोरेखित झाले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि निरोगी स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते. एकूण ७१ विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या स्पर्धांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीत मोलाची भर घातली.