नारी शक्तीचा नवा उल्हास, योगासनाने करूया आरोग्याचा विकास!
International Yoga Day : आयोजक: अहिल्यानगर शहरामध्ये योग विद्या धाम, अहिल्यानगर (Yoga Vidya Dham, Ahilyanagar) यांच्या वतीने जागतिक योग दिनाचे (International Yoga Day) औचित्य साधून भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेतली जाणार आहे.
स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी असणार दोन गट
स्पर्धेचे विषय
१. खुला गट :
- अष्टांग योग – आत्म्याशी मैत्री करण्याचा मार्ग
- आधुनिक जीवनशैली आणि योग साधना
- योग – केवळ शारीरिक व्यायाम की जीवन पद्धती
- योग – संस्कृतीकडून समृद्धीकडे आणि विज्ञानाकडून अध्यात्माकडे
२. शालेय गट :
- योगाभ्यासाचे आरोग्यासाठी महत्त्व
- निरोगी जीवनाची गुरुकिल्ली – योग
- शालेय जीवनात योगाचे महत्त्व
- 🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी खालील नियमावली (International Yoga Day)
- * शब्दमर्यादा : ४०० ते १००० शब्द.
- * कागद : A-4 साईज पेपर वापरावा.
- * लेखन पद्धत : कागदाला योग्य मार्जिन (समास) सोडावे आणि फक्त एकाच बाजूला (One Side) लिहावे.
- * भाषा पर्याय : निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी (Marathi, Hindi, English)* यांपैकी कोणत्याही एका भाषेत लिहिता येईल.
- * सादरीकरण : निबंध पाकिटात बंद करून, पाकिटावर स्वतःचे नाव, पत्ता आणि फोन नंबर ठळकपणे लिहावा.
- * अंतिम तारीख : निबंध दिनांक २० जून २०२६ संध्याकाळपर्यंत खालील पत्त्यावर आणून द्यावेत.
- आकर्षक बक्षीसे
- दोन्ही गटांतील प्रथम तीन क्रमांकांना भव्य व आकर्षक बक्षीस आणि उत्तेजनार्थ परितोषिके दिली जातील.
महत्त्वाची नोंद : सहभागी स्पर्धकांसाठीचे रिटर्न गिफ्ट (सहभाग बक्षीस) फक्त पूर्व-नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांसाठीच उपलब्ध असेल.- निबंध जमा करण्याचा पत्ता :
योग विद्या धाम
चिंतामण कॉलनी, कुष्ठधाम रोड,
ज्ञानेश्वर मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या मागे,
सावेडी, अहिल्यानगर. - पूर्व नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
लँडलाईन : ०२४१-२४२१२५५
वेळ : सकाळी १० ते १ आणि दुपारी ४:३० ते ७
मोबाईल : ८२३७८ २९१३७ / *९३२६९ ४०१३६



