Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक किलो गुळासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

0
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक किलो गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक किलो गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

नगर : राज्यात साखरेच्या दरात ऐतिहासिक वाढ झाल्याचं (Sugar Price Hike) चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता साखरेनंतर गुळाच्या किमतीही (Jaggery Price Hike) वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुळाच्या एक किलोला ८० ते ८५ रुपये मोजावे लागत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी गुळाचे भाव ६० रुपये किलो होते. दहा किलोची भेली घ्यायची असेल ७० ते ७५ रुपये किलोने गूळ मिळत आहे.

नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत मोठा खुलासा,आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर

गुळाचे दर नेमके किती? (Jaggery Price Hike)

छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ बाजारात गुळासाठी आता ग्राहकांना किलोमागे ८० ते ८५ रुपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी हाच गूळ ६० रुपये किलो दराने मिळत होता. म्हणजेच पंधरा दिवसांत गुळाच्या दरात तब्बल २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. दहा किलोची भेली घेतल्यास होलसेल भाजरात ग्राहकांना ७० ते ७५ रुपये किलो मोजावे लागत आहेत. अचानक गुळाच्या दरात एवढी वाढ का झाली? बाजारात गुळाचा पुरवठा कमी झाला आहे का? की उत्पादन आणि मागणीतील बदलाचा हा परिणाम आहे? ऐन सणासुदीच्या तोंडावरती दरवाढ झाल्याने सामान्य नागरिकांच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे.

अवश्य वाचा : केंद्र सरकारने उचलले मोठं पाऊल, १० लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्क मुक्त आयातीला परवानगी

गुळ आणि साखरेच्या दारात ऐतिहासिक वाढ (Jaggery Price Hike)

साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होण्याची शक्यता आहे. गुळ आणि साखरेच्या दरात झालेली ही मोठी वाढ आता थेट मिठाई व्यवसायाच्या गणितावर परिणाम करू लागली आहे. कारण मिठाई तयार करण्यासाठी साखर हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा घटक आहे. त्यामुळे साखर महागली आणि मिठाई विक्रेत्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. याचा परिणाम मिठाईच्या दरांवर होण्याची शक्यता आहे.