Jayakwadi Dam : समन्यायी पाणी वाटपाचा संघर्ष; जायकवाडीला पाणी सोडण्याचा प्रश्न निकाली

पर्जन्य छायेतील भागात भूजल पातळी खालावलेली

0
Jayakwadi Dam : समन्यायी पाणी वाटपाचा संघर्ष; जायकवाडीला पाणी सोडण्याचा प्रश्न निकाली
Jayakwadi Dam : समन्यायी पाणी वाटपाचा संघर्ष; जायकवाडीला पाणी सोडण्याचा प्रश्न निकाली

Jayakwadi Dam : राहता : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील (Godavari Valley) धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असून जवळपास सर्वच  धरणांमधून पाण्याचा विसर्ग गोदावरी, दारणा ,पालखेड, नद्यांमध्ये सुरू आहे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात (Water reservoirs) वेगाने वाढ होत असून  बुधवारी (ता. २९) सायंकाळी जायकवाडीचा (Jayakwadi Dam) पाणीसाठा ७७.६६ टीएमसी झाला आहे तर उपयुक्त पाणीसाठा ५१.६० टीएमसी वर पोहोचला आहे. जायकवाडी धरण ६७ % भरले आहे. सायंकाळी धरणात २४ हजार १३२ क्युसेकने आवक होत असून  समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार यावर्षी नगर नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

नक्की वाचा : पारनेर येथे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या ‘सुवर्ण महोत्सवी’ वर्षाला प्रारंभ

पर्जन्य छायेतील भागात भूजल पातळी खालावलेली

गोदावरी नदीवरील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यावरून ३१ टीएमसी आणि प्रवरा नदीवरील ओझर बंधाऱ्यावरून दोन टीएमसी असे एकूण सुमारे ३३ टीएमसी पाणी आज पर्यंत जायकवाडी कडे वाहून गेले आहे.यापूर्वी सण २०१२ पासून २०२६ पर्यंत १५ वर्षात २०१२, २०१३, २०१४, २०१५ , २०१८ आणि २०२३ या वर्षांमध्ये पाणी सोडण्यात आले होते.महत्त्वाची बाब म्हणजे सह्याद्री घाटमाथा व परिसर वगळता अहिल्यानगर व नाशिकच्या पर्जन्य छायेतील असलेल्या उर्वरित भागात अद्याप पर्यंत सरासरीच्या ४० टक्के इतकाच पाऊस झाला आहे त्यामुळे खरिपाची पिके जेमतेम आहे येथील पर्जन्य छायेतील भागात सध्या भूजल पातळी खालावलेली आहे सरासरी पावसाच्या केवळ  निम्म्यापेक्षा कमी सरासरीने पाऊस झाला असून त्यावर खरिपाच्या बहुतांश पेरण्या झाल्या आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मोठ्या पावसाची प्रतीक्षा (Jayakwadi Dam)

दरम्यानच्या काळात पावसाचा दीर्घकालीन खंड पडल्याने पिकांना पाण्याचा ताण बसला आहे सध्या हलक्या स्वरूपात  जेमतेम रिमझिम पाऊस पडल्याने पिकांना काही दिवसांसाठी तरी जीवदान मिळाले आहे त्यामुळे गोदावरी कालवे लाभक्षेत्रासह सर्वच भागात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे मोठा पाऊस न झाल्याने भूजल पातळी वाढली नाही. परिणामी विहिरीतील पाण्याचे तळ गाठला आहे.त्यासाठी ओव्हर फ्लोचे पाणी गोदावरी कालव्यांद्वारे लाभ क्षेत्रात सोडले तर भूजल पातळी वाढण्यास व खरीप हंगामातील पिकांना तसेच फळबागा, ऊस, चारा पिके यांना मदत होईल आणि त्या अनुषंगाने रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांचे सुयोग्य नियोजन शेतकऱ्यांना करता येईल त्याचप्रमाणे भंडारदरा, निळवंडे ही धरणे सुद्धा भरली असून निळवंडेच्या कालव्यांना पाणी सोडण्यात यावे अशी मागणी लाभ क्षेत्रातून शेतकऱ्यांची होत आहे