
New Arts, Commerce and Science College : पारनेर : तालुक्यातील न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाच्या (New Arts, Commerce and Science College) सुवर्ण महोत्सवी वर्षाचा दिमाखदार व पर्यावरणपूरक प्रारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. ‘केवळ वृक्षारोपण (Tree plantation) नव्हे, तर वृक्षसंवर्धन’ हा निसर्गरक्षणाचा ठाम संदेश देत या प्रसंगी महाविद्यालय परिसरात विविध जातींच्या तब्बल ४० पारंपरिक वृक्षांच्या रोपांची यशस्वी लागवड करण्यात आली. या उपक्रमाने सुवर्ण महोत्सवी वर्षारंभाची (Golden Jubilee Year) सुरुवात एका अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक उपक्रमाने केली आहे.
नक्की वाचा : कर्जतकरांच्या सेवेत अत्याधुनिक सक्शन मशीन दाखल; राम शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
वृक्षसंवर्धन ही अत्यंत महत्त्वाची गरज
या विशेष हरित मोहिमेमध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC)या दोन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सक्रिय आणि उत्साही सहभाग नोंदवला. पर्यावरणाला अनुकूल ठरणाऱ्या आणि परिसराची शोभा वाढवणाऱ्या वनस्पतींची या वेळी निवड करण्यात आली. या मोहिमेंतर्गत खालील वृक्षांची लागवड करण्यात आली छायादायी व औषधी वनस्पती कडुनिंब, करंजी, बहावा, कदंब आणि सिल्व्हर ओक.याप्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी मोलाचे विचार मांडले. ते म्हणाले, “आजच्या काळात वृक्षसंवर्धन ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पर्जन्यचक्रावर चिंता व्यक्त (New Arts, Commerce and Science College)
केवळ एक दिवस झाड लावून आपले कर्तव्य संपत नाही, तर आपण लावलेल्या प्रत्येक झाडाची वर्षानुवर्षे काळजी घेतली गेली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने वृक्षसंवर्धन होईल आणि आपला निसर्ग समृद्ध होईल.”आजच्या बदलत्या हवामानावर आणि बिघडलेल्या पर्जन्यचक्रावर चिंता व्यक्त करत त्यांनी सांगितले की, निसर्ग पूर्वपदावर आणण्यासाठी वृक्षारोपण आणि त्याचे जतन करणे हाच एकमेव पर्याय आहे. आज रोपण केलेली पारंपरिक झाडे भावी पिढीला शुद्ध हवा, शीतल सावली आणि निरामय आरोग्य देतील. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी आपल्या सभोवतालच्या परिसरात नक्कीच झाडे लावतील आणि ती जोपासतील, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हा उपक्रम संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय
सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या या पहिल्याच उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ मार्गदर्शन न करता प्रत्यक्षात श्रमदान केले. यामध्ये उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे (IQAC) समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे,प्रा. डॉ. दिलीप ठुबे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. हरेश शेळके राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी,डॉ. प्रकाश गावित प्रा. नितीन निपुंगे डॉ. माया लहारे एन.सी.सी.चे कॅप्टन प्रा. भरत डगळे या सर्व मान्यवरांनी स्वतः पुढे येऊन खड्डे खोदून व रोपे लावून या उपक्रमात सहभाग घेतला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली. पारनेर महाविद्यालयाचा हा उपक्रम संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.


