Karjat Nagar Panchayat : कर्जतकरांच्या सेवेत अत्याधुनिक सक्शन मशीन दाखल; राम शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

स्वच्छता अधिक वेगवान व प्रभावीपणे राबविण्यास मदत

0
Karjat Nagar Panchayat : कर्जतकरांच्या सेवेत अत्याधुनिक सक्शन मशीन दाखल; राम शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Karjat Nagar Panchayat : कर्जतकरांच्या सेवेत अत्याधुनिक सक्शन मशीन दाखल; राम शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Karjat Nagar Panchayat : कर्जत : स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत कर्जत नगरपंचायतीसाठी (Karjat Nagar Panchayat) उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक सक्शन मशीनचे (suction machines) लोकार्पण विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांच्या हस्ते तर नगराध्यक्षा छाया शेलार यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी (ता. २८) झाले. याप्रसंगी मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा : विसापूर कारागृहातून जन्मठेपेच्या शिक्षेतील कैदी पसार; बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

स्वच्छता अधिक वेगवान व प्रभावीपणे राबविण्यास मदत

कर्जत नगरपंचायतीस स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत २५ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक सक्शन मशीन मंजूर झाले होते. मंगळवारी (ता. २८) या वाहनाचा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होत कर्जतकरांच्या सेवेत रुजू करण्यात आले. या सक्शन मशीनमुळे शहरातील सांडपाणी वाहिन्या, गटारे आणि मल निस्सारण व्यवस्थेची स्वच्छता अधिक वेगवान व प्रभावीपणे राबविण्यात मदत मिळणार आहे. नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होण्यास देखील मदत मिळेल. स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी कर्जत घडविण्याच्या दिशेने उचललेले सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया राम शिंदे यांनी यावेळी दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जी यंत्रणा अपुरी असेल त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार (Karjat Nagar Panchayat)

यावेळी बोलताना नगराध्यक्षा छाया शेलार म्हणाल्या की, आपल्या नगराध्यक्षा पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा माझ्या कार्यकाळातील पहिलाच लोकार्पण सोहळा आहे. सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व नगरसेवक-नगरसेविकांच्या सहकार्याने कर्जत शहराची स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत नागरी सुविधांच्या बळकटीकरणाला या नूतन सक्शन मशीनने अधिक गती मिळणार आहे. आगामी काळात जी यंत्रणा अपुरी असेल त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत सोडविण्यावर आपला भर असल्याची ग्वाही दिली.