Visapur Jail : विसापूर कारागृहातून जन्मठेपेच्या शिक्षेतील कैदी पसार; बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कारागृह प्रशासनाची नजर चुकवून अरोपी पसार

0
Visapur Jail : विसापूर कारागृहातून जन्मठेपेच्या शिक्षेतील कैदी पसार; बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Visapur Jail : विसापूर कारागृहातून जन्मठेपेच्या शिक्षेतील कैदी पसार; बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Visapur Jail : श्रीगोंदा : तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहात (Visapur Jail) खुनाच्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी पळून (Prisoner escape) गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. २८) घडली आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात (Belwandi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी लक्ष्मण जाधव, (रा.मळोली, जि.सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.

नक्की वाचा : पारनेरच्या मनसैनिकांची शासकीय गाडीवरील काळ्या काचांवर कारवाईची मागणी

कारागृह प्रशासनाची नजर चुकवून अरोपी पसार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील मळोली येथील रहिवासी असलेला शिवाजी लक्ष्मण जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने तो विसापूर खुल्या कारागृहात शिक्षा भोगत होता. मंगळवारी (ता. २८) कारागृह प्रशासनाची नजर चुकवून संधी साधून तो पसार झाला. कैदी नसल्याचे लक्षात येताच कारागृह प्रशासनाने परिसरात शोध घेतला, परंतू तो मिळून आला नाही. तपासकामी या घटनेची नोंद तत्काळ बेलवंडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून,  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कैद्याच्या शोधासाठी पथके रवाना (Visapur Jail)

घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके कैद्याच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत. या पसार आरोपीबाबत अथवा त्याच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here