Kidnapping : अपहरण करुन लूटमार करणारे चार आरोपी १२ तासांत जेरंबद; कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई

0
Kidnapping : अपहरण करुन लूटमार करणारे चार आरोपी १२ तासांत जेरंबद; कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई
Kidnapping : अपहरण करुन लूटमार करणारे चार आरोपी १२ तासांत जेरंबद; कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Kidnapping : नगर : अहिल्यानगर शहरातील चांदणी चौक परिसरात एका युवकाचे अपहरण (Kidnapping) करून त्याला मारहाण (Assault) करत एटीएममधून पैसे काढून लुटल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.१३) पहाटे घडली होती. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखत कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police Station) अवघ्या १२ तासांच्या आत चार संशयित आरोपींना ताब्यात घेत उल्लेखनीय कामगिरी केली.

नक्की वाचा: दगडफेक करत वाहनाची तोडफोड; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे शोध

या प्रकरणातील आरोपींना तातडीने ताब्यात घेतल्याबद्दल घुटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील तसेच त्यांच्या पथकाचा सत्कार करण्यात आला. याप्रकरणी राहुल चंद्रभान दारकुंडे (रा. घुटेवाडी, ता. श्रीगोंदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेत कारवाई केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे (Kidnapping)

कृष्णा दिनेश कोलोसिया (रा. भिंगार), बबन उर्फ आदिनाथ नवनाथ धाडगे (रा. भिंगार), यशदीप संजय पाडे (रा. फकीरवाडा, अहिल्यानगर)आणि पियुष उजागरे (रा. एमआयडीसी, अहिल्यानगर)असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणातील आरोपींना तातडीने ताब्यात घेतल्याबद्दल घुटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील तसेच त्यांच्या पथकाचा सत्कार करण्यात आला.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.