
Kotwali Police : नगर : अहिल्यानगर शहरात (Ahilyanagar city) दुचाकी चोरणारी दोघे संशयित आरोपी कोतवली पोलिसांनी (Kotwali Police) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या असून एक लाख 55 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सचिन भाऊसाहेब तेलोरे (वय ३६, रा. वाळकी, ता. नगर), संदीप शिवाजी घायमुक्ते (वय ३९, रा. राऊत मळा, वाकोडी रोड, अहिल्यानगर), असे ताब्यात (In custody) घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न
शहरातील दुचकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांचा माग काढत ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव साळवे (वय २८, रा. राऊत मळा, वाकोडी रोड, अहिल्यानगर) यांची ८० हजार रुपये किमतीची दुचाकी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी त्रिमुखे हॉस्पिटल, मार्केट यार्ड परिसरातून चोरीला गेली होती. याप्रकरणी ८ ऑक्टोबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना १३ ऑक्टोबर रोजी संदीप शिवाजी घायमुक्ते (वय ३९, रा. राऊत मळा, वाकोडी रोड, अहिल्यानगर) हा विनानंबरच्या दुचाकीसह पोलिसांना आढळला. चौकशीदरम्यान ही दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी ती जप्त केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नगर कॉलेजजवळील पार्किंगमधून दुचाकी चोरीला (Kotwali Police)
दरम्यान, संपत मांजरी (वय ३८, रा. डिग्रज, ता. राहुरी) यांची ४० हजार रुपये किमतीची लाल रंगाची दुचाकी १२ ऑक्टोबर रोजी नगर कॉलेजजवळील पार्किंगमधून चोरीला गेली होती. याप्रकरणी १४ ऑक्टोबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. १४ ऑक्टोबर रोजी मार्केट यार्ड परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना सचिन भाऊसाहेब तेलोरे (वय ३६, रा. वाळकी, ता. नगर) हा विनानंबरच्या दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने दुचाकी झुडिओ मॉल परिसरातून चोरल्याची माहिती दिली. त्याच्याकडून ही दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच, त्याने यापूर्वी चोरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली.
या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५५ हजार रुपयांच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणांचा पुढील तपास पोलीस नाईक उमेश गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ केकाण करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस यांच्यासह पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड, साबीर शेख, राहुल शिंदे, विनोद बोरगे, विशाल दळवी, उमेश गायकवाड, सोमनाथ केकाण, शिरीष तरटे, सुरज कदम, अतुल कोतकर, संदिप शिरसाठ, संकेत धिवर, रमेश शिंदे, अतुल लाटे, वैभव काळे, आकाश काळे, सत्यम शिंदे, अशोक काळे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू व अरुण सांगळे यांच्या पथकाने केली आहे.


